शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन बोगद्यांमधून धावणार मेट्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:14 IST

मेट्रो स्वतंत्र बोगद्यांमधून धावणार असली तरी भुयारातील स्थानकांमध्ये त्यांच्यातील अंतर कमी होऊन त्या एकत्र असतील व स्थानकाचा फलाट संपला की पुन्हा वेगळ्या होतील. 

ठळक मुद्देप्रत्येकी ६ मीटरचा व्यास :  ५ किलोमीटर अंतरासाठी दोन निविदाभुयारातील स्थानकात उतरून वर रस्त्यावर येण्यासाठी किंवा आत उतरण्यासाठी म्हणून प्रवाशांना सरकत्या जिन्यांची व्यवस्था

पुणे : मेट्रो च्या भुयारी मार्गाच्या दोन निविदा प्रसिद्ध झाल्या असून तत्पुर्वी बोगद्यात मेट्रो जाण्यासाठी लागणाºया शाफ्टचे (उतार) काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्येकी ६ मीटर व्यासाच्या दोन बोगद्यांमधून येणारी व जाणारी अशा दोन मेट्रो धावणार आहेत. मेट्रो च्या कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटर अंतराच्या भूयारी मार्गाच्या कामाबाबत पुणेकरांमध्ये औत्सुक्य आहे. जमिनीच्या खाली १८ ते २८ मीटर खोलीवर मेट्रोचा ट्रॅक (रूळ असतील) भुयारीतील मेट्रो जमीनीवरूनच धावणार आहे. प्रत्येकी ६ मीटर व्यासाचा असे दोन बोगदे असतील. जमिनीखाली किमान ३० मीटर अंतरावर ते असणार आहे. जाणारी व येणारी मेट्रो स्वतंत्र बोगद्यांमधून धावणार असली तरी भुयारातील स्थानकांमध्ये त्यांच्यातील अंतर कमी होऊन त्या एकत्र असतील व स्थानकाचा फलाट संपला की पुन्हा वेगळ्या होतील. प्रकल्प व्यवस्थापक अभियंता गौतम बिऱ्हाडे यांनी ही माहिती दिली. शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई व स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके या मार्गावर असतील. ती रस्त्याच्या वर कुठे खुली होतील (प्रवासी रस्त्यावर येण्याची जागा) ती ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तिथे साधारण १० मीटर जागा मेट्रोला लागणार आहे. संबधित जागामालकांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्या नुकसानभरपाईची बोलणी सुरू आहेत. भुयारातील स्थानकात उतरून वर रस्त्यावर येण्यासाठी, किंवा आत उतरण्यासाठी म्हणून प्रवाशांना सरकत्या जिन्यांची व्यवस्था असणार आहे.शहराच्या बरोबर मध्यभागातून हा भूयारी मार्ग जाणार असल्यामुळे त्याच्या खोदकामाचा रस्त्यावरच्या आसपासच्या इमारतींना धोका नाही का असे विचारले असता बिºहाडे यांनी सांगितले अत्यंत आधुनिक पद्धतीने हे खोदकाम होणार आहे. खोदताना निर्माण होणारी कंपने दुरवर पोहचणार नाहीत याची तांत्रिक व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे हादरे बसत नाही. आवाज होत नाही. बोगदा जेवढ्या आकाराचा तेवढेच कटर असते. ते शाफ्टमधून आत गेले की थेट काम संपते तिथेच वर काढण्यात येते. त्यामुळे कोणत्याही बांधकामांना कसलाही धोका निर्माण होणार नाही. पुण्यात ५ किलोमीटरच्या भुयारी मार्गाचे कृषी महाविद्यालय ते बुधवार पेठ व बुधवार पेठ ते स्वारगेट असे दोन भाग करण्यात आले आहेत. या दोन्ही भागांच्या स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मुंबई, दिल्ली व अन्य जिथे मेट्रो बोगद्यातून जाते तिथे याच पद्धतीने बोगद्यांचे खोदकाम करण्यात आले. त्याचा काहीही त्रास वरच्या जुन्या किंवा नव्या बांधकामांना झालेला नाही. तसेच निकष या कामाच्या निविदेतच स्पष्ट करण्यात आले असून ते पाळणे ठेकेदार कंपनीवर बंधनकारक असणार आहेत अशी माहिती बिºहाडे यांनी दिली. या कामाचा नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच काम केले जाणार आहे असे ते म्हणाले. कर्वेरस्त्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. नदीपात्रातील ५९ खांबांपैकी ३२ खाबांचे फौंडेशन पुर्ण झाले आहे. ३३ खांब पाईल पद्धतीने म्हणजे जमीनीत खोलवर छिद्र घेऊन त्यावर फौंडेशन व नंतर खांबाची उभारणी या पद्धतीने करण्यात येत आहे. पाऊस सुरू होण्यापुर्वी जास्तीतजास्त काम व्हावे असा प्रयत्न करण्यात येत आहे असे बिऱ्हाडे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो