शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

पुणे शहरातील पाच टप्प्यांवर डिसेंबर अखेरपर्यंत धावणार मेट्रो : महापालिकेच्या अर्थसंकल्पात घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 12:29 IST

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर

डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणार: महापालिकेच्या अर्थसंकल्पात घोषणा 

पुणे : पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थ संकल्प सोमवारी ( दि. 1) सादर करण्यात आला आहे. यात शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करण्याबाबत ठोस पावले उचलली आहे. तसेच पुणेकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाविषयी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. शहरातील पाच टप्प्यांवर डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो धावणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी जाहीर केले आहे. 

कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आरोग्य विषयक सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन 2021-22 चे तब्बल 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.यावेळी शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.

'मेट्रो' प्रकल्पाबाबत माहिती देताना रासने म्हणाले, पुढील ५० वर्षांचा वेध घेत पुणे शहराच्या चारही बाजूंना प्रत्येकी ५० किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका विस्तारित करण्यात येत आहेत. शिवसृष्टी ते रामवाडी, स्वारगेट ते निगडी, शिवाजीनगर ते हिंजवडी या तीन मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे वनाज ते गरवारे कॉलेज मार्गावर मार्च महिन्यात मेट्रोची ट्रायल रन सुरू होणार आहे. या मार्गावर ऑगस्टपर्यंत मेट्रो धावू शकेल. तसेच या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणे अपेक्षित आहे. सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट, स्वारगेट ते कात्रज, शिवाजीनगर ते हडपसर, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, वारजे ते स्वारगेट अशा मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम नियोजित आहे. 

स्वारगेट-कात्रज, नगर रस्ता बीआरटी कार्यान्वित

स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या ५.५० किलोमीटर लांबीच्या बी.आर.टी. मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

नगर रस्त्यावरील १६ किलोमीटर लांबीची बी.आर.टी. एस. योजना कार्यान्वित झाली आहे. पाटील इस्टेट जंक्शन ते हॅरिस ब्रिज, बोपोडी या ५.७० किलोमीटर रस्त्यापैकी पाटील इस्टेट ते रेंजहिल चौक या २ किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

 सिमला ऑफिस चौक ते राजीव गांधी पूल, औंध दरम्यान साडेसहा किलोमीटर लांबीचे प्रस्तावापैकी विद्यापीठ चौक ते औंध अशा ३.२ किलोमीटर लांबीचे रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

रेंजहिल चौक ते खडकी रेल्वे स्टेशन या २.२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम प्रस्तावित आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारितील जागेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू आहे.

गणेशखिंड रस्ता, पुणे-मुंबई रस्ता आणि पाटील इस्टेट ते संगमवाडी या मार्गावर १५ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाbudget 2021बजेट 2021Metroमेट्रो