मेट्रो, मोनोला आचारसंहितेचा ब्रेक

By Admin | Updated: September 13, 2014 05:19 IST2014-09-13T05:19:45+5:302014-09-13T05:19:45+5:30

विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने महापालिकेचे मेट्रो, बीआरटी, मोनोरेल तसेच पर्वती जलकेंद्राचे विस्तारीकरण इत्यादी प्रकल्प रखडणार आहेत

Metro, Monolay Code of Conduct Break | मेट्रो, मोनोला आचारसंहितेचा ब्रेक

मेट्रो, मोनोला आचारसंहितेचा ब्रेक

पुणे : विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने महापालिकेचे मेट्रो, बीआरटी, मोनोरेल तसेच पर्वती जलकेंद्राचे विस्तारीकरण इत्यादी प्रकल्प रखडणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मधल्या काळात या प्रकल्पासाठी कासवगतीने प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी हालचाल केल्याने या प्रकल्पांसाठीचे निर्णय आता सुमारे दोन महिने लांबणीवर पडणार आहेत. परिणामी या प्रकल्पांची किंमतही या उशिरामुळे वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान महापालिकेच्या अनेक निविदाही गेल्या आठवड्यात मार्गी
लागल्या असून, जुलैअखेरपर्यंत ५६९८ निविदांना महापालिकेने मंजुरी दिली असून त्यातून १८१ कोटी रुपयांची कामे मार्गी लागली असल्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)

Web Title: Metro, Monolay Code of Conduct Break