शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मेट्रो असताना परत टेकडीवर घाव कशासाठी? काँग्रेसचाही बालभारती-पौड रस्त्याला विरोध

By राजू इनामदार | Updated: April 6, 2023 17:29 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असे काँग्रेसचे म्हणणे आहे...

पुणे : कोथरूड व परिसरासाठी आता मेट्रो तयार होत असताना पुन्हा वाहतूकीचा प्रश्न उग्र झाल्याचे कारण देत वेताळ टेकडीवर घाव घालण्यामागे भारतीय जनता पक्षाचा मोठा डाव आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. बालभारती पौड रस्ता करण्याच्या आग्रहामागे राज्य सरकारमधील बडी हस्ती असून त्याच्या आग्रहापोटीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की, या विषयात काँग्रेस निसर्ग प्रेमींबरोबर आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, कोंडी टळावी यासाठीच शहरात मेट्रोचे काम सुरू करण्यात आले. कोथरूड परिसरात मेट्रोचा डेपो आहे. वनाज ते गरवारे या मार्गावर मेट्रोची ५ स्थानके आहेत. कोथरूड भागातील नागरिकांना या स्थानकांमध्ये पोहचता यावे यासाठी कनेक्टीव्हिटी तयार करण्यात येत आहे. या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत महामेट्रोला खडसावण्याचे सोडून सत्ताधारी वाहतूक कोंडीचेच कारण देत आता वेताळ टेकडीचा घास घ्यायला निघाले आहेत. हे नियोजन व कल्पनाशुन्यतेचे उदाहरण आहे, मात्र तरीही ते केले जाते यामागे भाजपची बडी हस्तीच आहे.

वेताळ टेकडीवरील पर्यावरण, पक्ष्यांचा अधिवास यांना धक्का पोहचवणारा हा प्रस्तावित रस्ता झाला तर अशी कोणती वाहतूक कोंडी सूटणार आहे हे पालकमंत्ऱ्यांनी पुणेकर नागरिकांना जाहीरपणे समजावून सांगावे, त्यांची तर विरोधकांबरोबर साधी चर्चा करण्याचीही तयारी नाही अशी टीका जोशी यांनी केली. त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या रस्त्याच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत, पर्यावरणप्रेमी नागरिकांबरोबर चर्चा करत आहेत, बैठका घेत आहेत व त्याचवेळी पालकमंत्री पाटील मात्र रस्त्याच्या कामाची निविदा काढण्याची मागणी करत आहे हा काय प्रकार आहे असे जोशी म्हणाले. पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून वेताळ टेकडी वाचवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस