जेजुरीत मिळणार मीटरने पाणी
By Admin | Updated: January 25, 2017 01:25 IST2017-01-25T01:25:25+5:302017-01-25T01:25:25+5:30
जेजुरी शहरातील सुमारे तीन हजार नळजोड आहे. त्यांना वॉटर मीटर बसवण्यात येणार आहेत. येत्या १ एप्रिल २०१७ पासून मीटर

जेजुरीत मिळणार मीटरने पाणी
जेजुरी : जेजुरी शहरातील सुमारे तीन हजार नळजोड आहे. त्यांना वॉटर मीटर बसवण्यात येणार आहेत. येत्या १ एप्रिल २०१७ पासून मीटर पद्धतीने पाणी बिल आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती जेजुरीचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि. २०) जेजुरी शहरातील नळजोडांना मीटर बसवण्याचा शुभारंभ जेजुरीच्या नगराध्यक्षा साधना दीडभाई यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष लालासाहेब जगताप, पाणीपुरवठा समितीचे सभापती सुधीर गोडसे, नगरसेवक गणेश आगलावे, सत्यवान उबाळे, नगरसेविका अमृता घोणे, शोभा जगताप, ज्ञानेश्वरी बारभाई, संगीता जोशी, साधना दरेकर, सोनाली मोरे आदी उपस्थित होते.
नळजोडांना बसवण्यात येणारे मीटर यूएसए आयट्रोन कंपनीचे असून एमआयडी रजिस्टर व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मान्यताप्राप्त आहेत. नगरोत्थान अभियानांतर्गत शासनाने सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिलेले आहे. बसवण्यात येणाऱ्या मीटरला तीन वर्षांची गणती आहे. नागरिकांवर याचा कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र १ एप्रिल २०१७ पासून मीटर रीडिंगप्रमाणे पाणी बिलाची आकारणी होणार आहे. नळजोडांना मीटर बसवल्यानंतर पाणीही मुबलक प्रमाणात मिळणार आहे. (वार्ताहर)