सासवड येथे स्वच्छतेचा संदेश

By Admin | Updated: January 5, 2016 02:29 IST2016-01-05T02:29:18+5:302016-01-05T02:29:18+5:30

सासवड नगरपालिकेच्या १४७व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला. या वेळी नगरध्यक्षा आनंदीकाकी जगताप

Message of cleanliness at Saswad | सासवड येथे स्वच्छतेचा संदेश

सासवड येथे स्वच्छतेचा संदेश

सासवड : सासवड नगरपालिकेच्या १४७व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला.
या वेळी नगरध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगरसेवक संदीप जगताप, मनोहर जगताप, अजित जगताप, सचिन भोंडे यांसह प्रशासन अधिकारी राजीव मोहिते, कार्यालयीन अधीक्षक प्रमिल सरोदे, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, पाणी पुरवठा प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे, संजय पवार, सोपानकाका जगताप, अनिल जगताप, रंजना दुर्गाडे तसेच सासवडमधील विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उप्स्थित होते. जिल्हा होमगार्ड अधीक्षक प्रा. दीपक जांभळे यांनी स्वच्छतेची शपथ दिली. सासवड नगरपालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून प्रभातफेरीला सुरुवात झाली.

Web Title: Message of cleanliness at Saswad