रुपी बँकेचे विलीनीकरण करा : खासदार बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST2021-07-28T04:10:56+5:302021-07-28T04:10:56+5:30
नियम ३७७ अन्वये त्यांनी लोकसभेत विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. विलीनीकरणासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ...

रुपी बँकेचे विलीनीकरण करा : खासदार बापट
नियम ३७७ अन्वये त्यांनी लोकसभेत विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. विलीनीकरणासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी रिझर्व्ह बँकेला सूचना कराव्यात, असेही बापट म्हणाले. बापट म्हणाले की, पुण्याची रुपी बँक एकशे आठ वर्षे जुनी आहे. या बँकेत चार लाख खातेदारांनी ठेवी ठेवल्या आहेत. बँकेकडे बाराशे कोटी रुपयांचे डिपॉजिट आहेत. विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी ही बँक स्थापन केली. त्याकाळी एक एक रुपया गोळा करून लोकांनी ही बँक उभी करण्यास मदत केली होती. आजही या बँकेच्या खातेदारांमध्ये ज्येष्ठ नागरिक, निवृत्तीवेतनधारक आणि मध्यमवर्गीय लोकांचा समावेश आहे. मी आजपर्यंत या प्रश्नाबाबत अनेक वेळा विविध पातळीवर तसेच लोकसभेतही या बँकेच्या विलीनीकरणाचा मुद्दा मांडला होता.