शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांचा बनावट माल तयार करणारा व्यापारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 21:14 IST

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या लोकप्रिय बँडचा बनावट माल तयार करुन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पुणे : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या लोकप्रिय बँडचा बनावट माल तयार करुन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. हितेश राघवजी रावरिया (वय ३०, रा़ सिलीकॉन विश्व, नऱ्हे रोड) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखेने कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथील गोदामावर छापा टाकून १६ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिटमधील पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना कोंढव्यातील गोदामात नामांकित कंपन्यांच्या मालासारखा हुबेहुब बनावट माल तयार केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोकुळनगरमधील भाविका बायोकेमच्या गोदामावर गुरुवारी छापा घातला.त्यात हितेश रावरिया हा टॉयलेट क्लिनर, डिश वॉश, फ्लोअर क्लिनर, ग्लास क्लिनर वगैरे बनावट माल तयार करत असताना पकडण्यात आले. त्याच्या जवळच आणखी दोन गोदामात नामाकिंत बँडचे डिटर्जंट पावडर, फेस वॉश क्रिम, टॅमरिक क्रिम, ऑईल, हँड वॉश एअर फ्रेशनर असा बनावट तयार केलेल्या मालाचा साठा करुन ठेवण्यात आला होता. हितेश रावरिया याचा या व्यवसायाचे मालक रामजी महादेव पटेल (वय ४२, रा़ लेकटाऊन, बिबवेवाडी) व त्यांचे इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे. या मालाशी संबंधित मुळ कंपन्यांचे तपासणी अधिकारी आखलेश पांडे यांनी या जप्त केलेल्या मालाची पाहणी करुन हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचा माल बनावट व निकृष्ट दर्जाचा असल्याचे व इतर कंपन्यांचा मालही नकली असल्याचे सांगितले. हितेश रावरिया याला न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, कर्मचारी संतोष क्षीरसागर,  अतुल साठे, दत्तात्रय गरुड, प्रवीण तापकीर, संदीप तळेकर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे, दत्तात्रय गरुड, सुजीत पवार यांच्या पथकाने केली. 

दाेन वर्षांपासून चालू हाेते बनावट प्रकरणहितेश रावरिया हा मुळचा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मेघपर येथील राहणारा आहे. तो सुमारे २ वर्षांपासून गोदाम भाड्याने घेऊन राजरोजपणे भरवस्तीत व्यवसाय करत होता. भारतातील नामांकित कंपन्यांचा बनावट माल तयार करुन त्यावर स्वत:ची फोलेक्स कंपनी रजिस्टर नसताना रजिस्टर असल्याचा लोगो लावत होता़ त्याद्वारे तो मालाचे उत्पादन करुन तो माल बाजारातील वेगवेगळ्या व्यापाºयांना विक्री करुन त्यांचे मार्फत या मालाची सर्व सामान्य ग्राहकांना विक्री करुन फसवणूक करीत होता. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक