अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणाला ग्रामस्थांचा चोप

By Admin | Updated: May 22, 2014 05:48 IST2014-05-22T05:48:17+5:302014-05-22T05:48:17+5:30

सोनवडी (ता. भोर) येथील अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्याशी अश्लील चाळे करणार्‍या तरुणाला ग्रामस्थांनी पकडून चोप दिला

Mention of minor molestation, hoot the youth to the villagers | अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणाला ग्रामस्थांचा चोप

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणाला ग्रामस्थांचा चोप

नसरापूर : सोनवडी (ता. भोर) येथील अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्याशी अश्लील चाळे करणार्‍या तरुणाला ग्रामस्थांनी पकडून चोप दिला व नसरापूर येथील राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. अक्षय अजित शिंदे (वय २५ रा. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) हा सोनवडी येथील भवानी मातेच्या मंदिराच्या बांधकामास आलेला मजूर आहे. अक्षय शिंदे याने २० मे रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास मंदिराजवळच राहणार्‍या सहा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला पिण्यासाठी पाणी मागितले. मुलीने पाणी आणून दिल्यानंतर भवानीमाता मंदिर आवारात शिंदे याने मुलीला मारहाण करून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. शाहूराव साळवे तपास आहेत. (वार्ताहर)

Web Title: Mention of minor molestation, hoot the youth to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.