मनोरुग्णालयाची मानसिक आरोग्य दिंडी
By Admin | Updated: July 10, 2015 02:07 IST2015-07-10T02:07:30+5:302015-07-10T02:07:30+5:30
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानसिक आरोग्य जनजागृती ¨दंडी काढून मनोविकारांविषयी वारक-यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

मनोरुग्णालयाची मानसिक आरोग्य दिंडी
येरवडा : प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानसिक आरोग्य जनजागृती ¨दंडी काढून मनोविकारांविषयी वारक-यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. फुलेनगरपासून ज्ञानेश्वर पादुका मंदिरार्पयत शुक्रवारी (दि. 1क्) ही ¨दंडी काढण्यात येईल.यिाबाबत मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर, वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मधुमीता बहाले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रचना गोस्वामी, मुख्य प्रशासकीय अधिकारी कमल घोटकर, मनोरुग्णतज्ज्ञ परिचारक दत्तात्रय कर्डीले, लघु व टंकलेखक चंदा लांडगे उपस्थित होत्या.यिा ¨दंडीमध्ये मनोरुग्णालयाचे 4क् ते 5क् अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील. या सर्वाच्या हातामध्ये मानसिक आरोग्याविषयीचे प्रबोधनात्मक घोषवाक्ये व म्हणी लिहिलेले फलक असतील. मनोरुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त जानेवारी ते डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाघोली ग्रामपंचायतीच्या सहका:याने आठवडेबाजारात नाटिका व प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आल्याचे डॉ. डोंगळीकर यांनी सांगितले.विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी 13 समित्या स्थापण्यात आल्या आहेत. या सर्व समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक मुख्य समिती (कोअर कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. यिा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मधुमीता बहाले कामकाज पाहत आहेत. (वार्ताहर)
> मनोरुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त औंध जिल्हा रुग्णालयात 26 फेब्रुवारीला ‘मेंटल हेल्थ हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येकाला समुपदेशन करून त्यांच्या परिसरातील मानसिक रुग्णालयांची माहिती याद्वारे देण्यात येत असल्याचे डॉ. मधुमीता बहाले यांना सांगितले.4ियेरवडय़ातील प्रादेशिक मनोरुग्णालय 100 वर्षापूर्वी मुंबईतील कुलाबा या ठिकाणी होते. 1915मध्ये रुग्णालय येरवडय़ात स्थलांतरित करण्यात आले. यासाठी मुंबईहून स्वतंत्र रेल्वेगाडी पाठविण्यात आली होती. या रेल्वेगाडीमधून प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, मनोरुग्ण, कागदपत्रे, साहित्य आदी पुण्यात स्थलांतरित करण्यात आले. रुग्णालयात सध्या 1,700 रुग्ण व 950 कर्मचारी आहेत.