शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर होणार संत नामदेव महाराजांचे स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 12:38 IST

पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये, दुसरा टप्पा २० कोटी रुपये व तिसरा टप्पा १५ कोटी रुपये आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्राचा वापर : शासनाकडे आराखडा सादर करण्यात येणार

पुणे : नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर शासनाच्या दहा एकर जागेवर एकूण ६० कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून श्री विश्व संत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभे करण्यात येणार आहे. या नियोजित जागेवरील संत नामदेवमहाराज स्मारकामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, याकरिता नामदेव समाजोन्नती परिषदेने अभ्यासू व तज्ज्ञ मार्गदर्शकांची बैठक कसबा पेठेतील श्री संत नामदेव मंदिर येथे नुकतीच पार पडली.बैठकीत सर्व उपस्थित तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. चर्चेनंतर स्मारकाबाबत कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात, या निर्णयाचे अधिकार नामदेव समाजोन्नती  परिषद समितीस देण्यात आले. या बैठकीस अ‍ॅड. जी. व्ही. लाळगे,  शिवनाथ मुळे, अनिल निकते, दिगंबर क्षीरसागर, संजय वैद्य, वसंतराव  खुर्द, सुहास पतंगे, राहुल सुपेकर, मनोज बारटक्के  उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष सुधीर पिसे, सचिव डॉ. अजय फुटाणे, पुणे विभाग उपाध्यक्ष  संजय नेवासकर, सहसचिव बापूसोा बोत्रे, शहराध्यक्ष संदीप लचके, सुभाष मुळे  यांनी केले. ......या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाकडे आराखडा सादर करण्यात येणार आहे. हा आराखडा तीन टप्प्यांमध्ये तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये, दुसरा टप्पा २० कोटी रुपये व तिसरा टप्पा १५ कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असणारा निधी १५ कोटी रुपये शासनाने यापूर्वीच मंजूर केला आहे व उर्वरित टप्प्यातील रक्कम केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान व वारकरी, फडकरी, सर्व जातीधर्मातील बांधवांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPandharpurपंढरपूरTempleमंदिर