पंचायत समिती सदस्याने केली शिवीगाळ

By Admin | Updated: March 21, 2017 05:25 IST2017-03-21T05:25:30+5:302017-03-21T05:25:30+5:30

सरपंचाच्या खुर्चीवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब मोकाशी यांनी

A member of the Panchayat Samiti, | पंचायत समिती सदस्याने केली शिवीगाळ

पंचायत समिती सदस्याने केली शिवीगाळ

पुणे : सरपंचाच्या खुर्चीवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब मोकाशी यांनी कोंढवा धावडे ग्रामसेवक अभय निकम यांना चांगलीच शिविगाळ केली. तुम्हाला बसण्यासाठी दुसरी खुर्ची देतो असे सांगून देखील मोकाशी यांनी अरेरावीच्या भाषेत निकम यांनाच दमदाडी केली. या प्रकाराची राज्य ग्रामसेवक संघटनेच्या हवेली शाखेकडून निषेध करून याबाबत गटविकास अधिका-याकडे लेखी निवेदन दिले.
हवेली पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोकाशी अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मोकाशी शनिवार (दि.१८) रोजी कोंढवा धावडे ग्रामपंचायती काही कामासाठी गेले होते. यावेळी मोकाशी यांनी कोणताही राजशिष्टाचार न पाळता थेट सरपंच यांच्या खुर्चीवर बसले. हे लक्षात आल्यावर निकम यांनी तुमच्या साठी दुसरी खुर्ची मागवतो असे सांगितले. यावर चिडलेल्या मोकाशी यांनी ग्रामसेवकाला अरेरावीच्या भाषेत शिविगाळी करण्यास सुरुवात
केली. (प्रतिनिधी)

Web Title: A member of the Panchayat Samiti,