सभासद आक्रमक; संचालक निरूत्तर

By Admin | Updated: September 13, 2014 05:29 IST2014-09-13T05:29:53+5:302014-09-13T05:29:53+5:30

आक्रमक सभासद व निरूत्तर संचालक मंडळ अशीच परिस्थिती आज दिवसभर सोमेश्वरच्या वार्षिक सभेत दिसून आली

Member aggressor; Operator no | सभासद आक्रमक; संचालक निरूत्तर

सभासद आक्रमक; संचालक निरूत्तर

सोमेश्वरनगर : आक्रमक सभासद व निरूत्तर संचालक मंडळ अशीच परिस्थिती आज दिवसभर सोमेश्वरच्या वार्षिक सभेत दिसून आली. खंडाजंगी वातावरणात पार पडलेल्या या सभेत अध्यक्षांनी शेवटी कहरच केला. त्यांच्या मनमानीचा शेतकऱ्यांनी निषेध केला. गोंधळातच या सभेची सांगता झाली.
आज सोमेश्वर ची वार्षीक सभा पार पडली. त्यावेळी काही विषय शिल्लक होते. उर्वरित सहा विषयांवर चर्चा करण्यासाठी आजची सभा तहकुब करून उद्या घ्या, अशी मागणी सभासदांनी केली मात्र स्वत: अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी विषय पत्रिका वाचण्यास सुरूवात केली आणि काही सभासदांनी मंजूर, मंजूर म्हणत सभेची सांगता केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सभासद शेतकऱ्यांनी अध्यक्ष या मनमानीचा जाहीर निषेध केला.
सेवा संघाची कागदपत्रे, आॅडीट रिपोर्ट, गेल्या सेभेचा विषय नंं. १ व ३ नामंजूर करावा, उचललेले कर्ज, अहवालातील दाखविलेले ५२ कोटी बोगस आहेत. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सर्वसाधारण सभेत सभासद शेतकऱ्यांनी केली. त्यावर संचालक मंडळ निरूत्तर झाले.
सभासदांचे समाधान होण्यासारखी उत्तरे संचालक मंडळाकडून सभागृहाला मिळाली नाहीत. त्यामुळे ही सभा तहकूब करून उद्या परत सभा बोलवावी अशी मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांनी केली. दुपारी १ वाजता सोमेश्वर कारखान्याच्या ५० व्या वार्षीक सभेला शिवाजी प्रांगणात सुरूवात झाली. गेल्या १० वर्षाच्या इतिहासात पहील्यांदाच एवढया मोठया प्रमाणात सभासदांनी हजेरी लावली होती. सभेच्या सुरूवातीला अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. कदाचित ही सोमेश्वर कारखान्याची शेवटची सभा असणार आहे. कारखान्याच्या संस्थापकांची अब्रु या संचालक मंडळाने घालविली आहे. चार वर्षापासून सांगत होतो सोमेश्वर कर्जात चाललाय. मात्र मंजूर मंज़ूर ची नुसती घाई लागली होती. प्रतापगड कारखान्यावर गरज नसताना ८ कोटी ८२ लाख खर्च केला. एका वेळेस अनेक बँकांची कर्ज काढता येत नसताना या संचालकानी एका वेळी तीन बँकांची कर्जे काढली. त्यांनी बँक, सरकार व सभासदांची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर फौजदारी का करू नये. बेसल डोसचे कारखान्यावर अजून ७३ कोटी ४० लाख कर्ज आहे. त्यामुळे गेल्या सभेच्या अहवालातील विषय क्र १ व ३ वगळता इतर विषय मंजूर करावेत असे सांगतले यावर सभागृहात काही काळ गोंधळ उडाला होता. पहील्या विषयावर तब्बल सहा तास चर्चा रंगली. यावर अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी मागील अहवालात दुरूती करणे कसे शकय आहे. गेल्या चार वर्षात ५८ कोटी रूपयांचा खर्च टाकणे राहून गेला होता. तो या अहवालात सभासदांपुढे मांडला आहे. त्यामुळे विषय क्रमांक १ ला मंजूरी द्यावी. यावर सतिश काकडे यांनी मतदान घेण्याची मागणी केली. यावर अध्यक्ष जगताप यांनी मतदानाची वेळ येऊ न देता हा कारखाना आपल्याला चालवयाचा आहे. सद्या कारखान्यापुढे अडचणी आहेत त्यातून मार्ग काढला पाहीले असे स्पष्ट केले. यावर सतिश काकडे म्हणाले, कारखाना संचालक मंडळाने अडचणीत आणला.
अहवालातील ५२ कोटी रूपये हे बोगस असल्याचा आरोप सतिश काकडे यांनी केल्यावर अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी संचालक मंडळाने जर भष्ट्राचार केला असेल तर सर्वात पहीला मी राजीनामा देईन. विषय नामंजूर करून कारखाना अडचणीत आणायचाय काय? जमा खर्च सभासदांपुढे मांडलेला आहे, असे जगताप म्हणाले, त्यावर सरकारी आॅडीट अणणार असल्याचे सतिश काकडे यांनी सांगीतले. कारखान्यात गेल्या २२ वर्षात संवा संघात घोटाळे, बोगस व्हाऊचर यामुळे खरा सोमेश्वर अडचणणीत आला आहे. आता संचालक मंडळाला सोडणार नाही. त्यांना बेडया ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही. सेवा संघाचा सचिव, कागदपत्रे व आॅडीट रीपोर्ट मागवा तो पर्यंत ही सभा तहकूब करून दोन दिवसांनी पुन्हा बोलावू, असे काकडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अध्यक्ष जगताप यांनी सरळ विषय पत्रिकेचेच वाचन सुरू केले आणि काही सभासदांनी मंजूर, मंजूर अशा घोषणा देत गोंधळातच सभेची सांगता केली.

Web Title: Member aggressor; Operator no

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.