मराठी बाणा कार्यक्रमाबरोबर रंगणार मेगा बंपर लकी ड्रॉ
By Admin | Updated: November 28, 2015 00:53 IST2015-11-28T00:53:01+5:302015-11-28T00:53:01+5:30
‘लोकमत’ आयोजित ‘दीपोत्सव २०१५’ या योजनेचा १३ आॅक्टोबर घटस्थापनेपासून भव्य शुभारंभ झाला आणि दिवाळीपर्यंत खरेदीचा आणि बक्षिसे जिंकण्याचा आनंद

मराठी बाणा कार्यक्रमाबरोबर रंगणार मेगा बंपर लकी ड्रॉ
पुणे : ‘लोकमत’ आयोजित ‘दीपोत्सव २०१५’ या योजनेचा १३ आॅक्टोबर घटस्थापनेपासून भव्य शुभारंभ झाला आणि दिवाळीपर्यंत खरेदीचा आणि बक्षिसे जिंकण्याचा आनंद आणि उत्कंठा उत्तरोत्तर वाढत गेली. पुणेकरांना खरेदी करताना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली आहे ‘लोकमत दीपोत्सव २0१५ मुळे.’ या योजनेचे यशस्वी हे चौथे वर्षे आहे.
१३ आॅक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत सहभागी झालेल्या व्यावसायिकांकडून खरेदी केल्यास अनेक बक्षिसांची लयलूट होणार होती.
या योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १००हून अधिक व्यावसायिकांनी सहभाग घेतला, तर लाखो पुणेकरांनी यात भाग घेत आपल्या खरेदीचा आनंद व्दिगुणित केला. या योजनेच्या मेगा बंपर लकी ड्रॉ सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे चौरंग निर्मित अशोक हांडे दिग्दर्शित ७०
एमएम ‘मराठी बाणा.’ या भव्य कार्यक्रमात मराठमोळ्या संस्कृतीचे गायन, वादन, नृत्य अशा कलाविष्कारातून उपस्थितांना दर्शन होणार आहे.
सर्व बक्षिसांचा लकी ड्रॉ सोहळा या भव्य कार्यक्रमात होणार आहे. तसेच, या एक महिन्याच्या कालावधीमध्ये दोन साप्ताहिक सोडतींचाही समावेश होता. त्यामध्ये प्रत्येक आठवड्यात व्हिडीओकॉन यांच्यातर्फे पहिले बक्षीस म्हणून दोन ३२’’ एलईडी टीव्ही, तर ९९९० रु. किमतीच्या युनिकेअर वॉटर
ट्रीटमेंट प्लांट यांच्या ५ वॉटर प्युरिफायरचा समावेश आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातील मुख्य बक्षीस विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळाही या कार्यक्रमात होणार आहे.
(प्रतिनिधी)हा सोहळा मुख्यत: लोकमत दीपोत्सव योजनेत सहभागी व्यावसायिकांसाठी आणि सखी मंच सदस्यांसाठी आयोजित केला आहे.
सखी मंच सभासदांना कार्यक्रमाच्या प्रवेशिका दि.२९ नोव्हेंबरपासून निवडक केंद्रांवर मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहील.
त्याबद्दलची सविस्तर माहिती उद्याच्या ‘लोकमत’मधून प्रसिद्ध केली जाईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.