शहर काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:50+5:302021-09-06T04:15:50+5:30
पुणे : महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. शहर काँग्रेस पक्षातही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि ...

शहर काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू
पुणे : महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. शहर काँग्रेस पक्षातही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका सुरू झाल्या आहेत. काँग्रेस भवनामध्ये शहरातील कार्यकर्त्यांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. निवडणुकांच्या काळात घडणाऱ्या कोणत्याही घडामोडींमुळे विचलित न होता काँग्रेसचे कार्यकर्ते नेटाने महापालिका निवडणुकांना सामोरे जातील, असा विश्वास माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
निवडणुका जवळ आल्या की अनेक घडामोडी घडतात, काही जण संधिसाधूपणाने भूमिका बदलत असतात; पण यातून अजिबात विचलित न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने निवडणूक लढवितील. काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. विविध जातीधर्मांना एकत्र घेऊन सलोख्याने वागणाऱ्या काँग्रेस पक्षाचे महत्त्व पुणेकरांना पटले आहे, असे मोहन जोशी यांनी बैठकांमधून सांगितले.
महापालिका निवडणूक वॉर्ड पद्धतीने होवो अथवा द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने होवो काँग्रेस पक्षाची सामोरे जाण्याची जय्यत तयारी आहे, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.