रखडलेल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री घेणार बैठक
By Admin | Updated: June 21, 2014 23:16 IST2014-06-21T23:16:23+5:302014-06-21T23:16:23+5:30
शहरातील विकासकामे मार्गी लागत नसल्याने पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उद्या (रविवारी) घेणार आहेत.

रखडलेल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री घेणार बैठक
>पुणो : महापालिकेत सत्ता असूनही शहरातील विकासकामे मार्गी लागत नसल्याने पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उद्या (रविवारी) घेणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला बसलेला फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी पवार यांनी महापौर बंगल्यावर बैठक बोलावली असून, या बैठकीत ते नगरसेवकांची झाडाझडती घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, नगरसेवकांची कामे मार्गी लागावीत यासाठी या बैठकीस महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
अवघ्या दोन वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला शहरात चांगले यश मिळाले आहे. राष्ट्रवादीने महापालिकेत काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन केली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरात आघाडीच्या उमेदवाराचा मोठय़ा मताधिक्क्याने पराभव झालेला आहे. त्याची धास्ती पक्षाने घेतली असून, विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसू नये या उद्देशाने शहरातील जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावून निवडणुकीत पुणोकरांसमोर जाण्याचा पक्षाचा मानस आहे. मात्र, पालिकेत सत्ता असूनही गेल्या काही वर्षात शहराच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे पुणोकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली असून, ही कामे मार्गी लावण्यासाठी पवारांनी तातडीची बैठक बोलाविली आहे. यात नगरसेवकांच्या कामाचा आढावा स्वत: पवार घेणार आहेत, तसेच नगरसेवकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
कामे होत
नसल्याच्या तक्रारी
4महापालिका प्रशासनामुळे पक्षाच्या नगरसेवकांची कामे
होत नसल्याच्या तक्रारीही अनेक नगरसेवकांनी केल्या असून, त्याबाबत चर्चाही या बैठकीत करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या काही पदाधिका:यांकडून सांगण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या बैठकीसाठी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे या पदाधिका:यांनी स्पष्ट केले.