विद्यार्थी, शिक्षकांच्या साहित्यकृतींवर संमेलन

By Admin | Updated: November 14, 2016 06:47 IST2016-11-14T06:47:41+5:302016-11-14T06:47:41+5:30

प्रसिद्ध साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या

Meeting on Student, Teacher's Literature | विद्यार्थी, शिक्षकांच्या साहित्यकृतींवर संमेलन

विद्यार्थी, शिक्षकांच्या साहित्यकृतींवर संमेलन

पुणे : प्रसिद्ध साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी एस. एम. जोशी सभागृह येथे करण्यात आले आहे.
संमेलनाध्यक्षपदी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, तर राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे असणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन दि. १४ रोजी सकाळी ९.३० वाजता २६ व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांच्या साहित्याचे सादरीकरण, कविसंमेलन, शिक्षकांच्या साहित्याचे सादरीकरण, साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांना ‘बाबा भारती प्रबुद्ध साहित्यिक पुरस्कार’ देऊन ज्येष्ठ कायदेतजज्ज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजिका विद्या चौकसे,
सुनीता ननावरे, प्रशांत रोकडे, कल्याणी मालुसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting on Student, Teacher's Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.