शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पाण्यावर महापाैरांची जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:32 IST

महापाैर, पालिका अधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांमध्ये बंद दाराआड बैठक सुरु झाली आहे. या बैठकीतून काय निर्णय हाेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुणे : जलसंपदा विभागाकडून बुधवारी दुपारी काेणतीही पूर्वसुचना न देता, अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला हाेता. त्यामुळे याचे तीव्र पडसाद उपटले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील ऐकत नसतील तर त्या मुजाेर अधिकाऱ्यांना मुक्ता टिळक या जाब विचारण्यासाठी आज सिंचनभवन येथे त्यांनी भेट घेणार हाेत्या. तसेच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना शहरामध्ये फिरकू देणार नाही, असा इशाराही टिळक यांनी दिला हाेता. सध्या महापाैर, पालिका अधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांमध्ये बंद दाराआड बैठक सुरु झाली आहे. या बैठकीतून काय निर्णय हाेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  महापालिका कालवा समिती व जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाचा दाखला देत जलसंपदा विभागाने गेल्या काही दिवसांत तीन वेळा अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, शहरात पाणी कपात करण्यात येऊ नये अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. पुणे दौ-यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करू नये असे थेट आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले होते. त्यानंतर देखील पुण्यातील जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार सुरुच असून, बुधवारी (दि.१६)  दुपारी पर्वती पंपिंग स्टेशनचा पाणी पुरवठा अचानक बंद केला. यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून पाणी पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :WaterपाणीMukta Tilakमुक्ता टिळकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका