महिलांच्या सुरक्षेविषयी आयटी कंपन्यांबरोबर बैठक
By Admin | Updated: February 13, 2017 02:02 IST2017-02-13T02:02:08+5:302017-02-13T02:02:08+5:30
हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत सुरक्षारक्षकाने रसिला राजू ओ़ पी़ हिचा गळा आवळून खून करण्याची घटना नुकतीच घडली होती़

महिलांच्या सुरक्षेविषयी आयटी कंपन्यांबरोबर बैठक
पुणे : हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत सुरक्षारक्षकाने रसिला राजू ओ़ पी़ हिचा गळा आवळून खून करण्याची घटना नुकतीच घडली होती़ या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेबाबत सोमवारी १३ फेबुवारी रोजी सायंकाळी ५़३० वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़
या बैठकीला आयटी कंपन्यांचे जनरल मॅनेजर, मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी आणि सिक्युरिटी एजन्सीचे अधिकारी यांना बोलाविण्यात आले आहे़ या बैठकीत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मार्गदर्शन करणार आहेत़
आयटी कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेबाबत शुक्ला यांनी सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते़ त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून, लोकांच्या सूचनांचा विचार करून त्यांनी एक नवीन मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे़ त्याची माहिती या बैठकीत देण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)