शिक्षण संचालकांबरोबर बैठक

By Admin | Updated: March 28, 2017 23:53 IST2017-03-28T23:53:10+5:302017-03-28T23:53:10+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या एकूण दहा मागण्या मान्य करण्यासाठी नुकतीच

Meeting with Education Directors | शिक्षण संचालकांबरोबर बैठक

शिक्षण संचालकांबरोबर बैठक

पेठ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या एकूण दहा मागण्या मान्य करण्यासाठी नुकतीच राज्याचे शिक्षण संचालक नामदेव जरग यांच्याशी पुणे येथे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असल्याची माहिती राज्य महामंडळाचे सचिव आदिनाथ थोरात यांनी दिली.
पुणे येथे शिक्षण संचालनालयात नुकतीच मुख्याध्यापक संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची शैक्षणीक वर्ष २०१६-१७ मधील संच मान्यतेबद्दल बैठक झाली. यावेळी शिक्षण संचालक नामदेव जरग, मुख्याध्यापक महामंडळ सचिव आदिनाथ थोरात, माजी अध्यक्ष अरुण थोरात, शिवाजीराव किलकिले उपस्थित होते. यावेळी संच मान्यतेमध्ये इयत्ता ९वी व १०वीसाठी ३१ ते ४० विद्यार्थ्यांसाठी २ शिक्षक पदे, ४१ ते ६० पर्यंत ३ शिक्षक व ६०च्या पुढे प्रत्येक ४० विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक पद मंजूर करावे. शासन निर्णय २८ आॅगस्ट २०१५, दि. ८ जानेवारी २०१६ व दि. २ जुलै २०१६ नुसार संच मान्यता शासन निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी. दि. २७ मे २०१६च्या शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक पद अतिरिक्त न दाखवता, ते सन २०१६-१७ च्या सेवक संच निश्चितीमध्ये पूर्वीप्रमाणे दाखविण्यात यावे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यभार एकत्र धरून सेवक संच निश्चित करण्यात यावी व त्या पदांना संरक्षण देण्यात यावे, असे मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष थोरात यांनी निवेदन दिले.
महामंडळाचे सचिव आदिनाथ थोरात यांनी यावेळी सेवक संच निश्चितीमध्ये एकाच शाळेतील ५ वी, ६ वी ते ८ वी व ९ वी, १० वी या तीनही विभागांतील विद्यार्थी संख्या कमी-जास्त झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी-जास्त होत असल्यास त्या शाळेच्या एकूण पदाच्या मर्यादेत राहून सदर पदे मान्य करण्यात यावीत. सेवक संच सन २०१४-१५ व २०१५-१६ च्या त्रुटीची पूर्तता न झाल्याने सन २०१६-१७ ची सेवक संच निश्चिती चुकीची झालेली आहे. त्या सर्वांची दुरुस्ती होऊन मिळावी. (वार्ताहर)

कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षक, विषयशिक्षक पूर्वीप्रमाणेच देण्यात यावे. सन २०१४-१५ ते २०१६-१७ च्या संचमान्यतेवरील निकषांनुसार दुरुस्त होऊन रिक्त अतिरिक्त पदांची कार्यवाही करण्यात यावी. तोपर्यंत कोणत्याही मुख्याध्यापकांचे, सेवकांचे, शाळांचे पगार थांबविण्यात येऊ नयेत. अशा प्रकारचे निवेदन राज्याचे शिक्षण संचालक नामदेव जरग यांना दिले.

Web Title: Meeting with Education Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.