रस्तारुंदीकरणाबाबत आळंदीत बैठक

By Admin | Updated: May 6, 2014 18:33 IST2014-05-06T18:31:13+5:302014-05-06T18:33:20+5:30

आळंदी देवाची : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत आळंदी नगरपरिषद हद्दीतील हवेली भागातील रस्ता रुंदीकरण भूसंपादनविषयी आज नागरिक व हवेली प्रांत स्नेहल बर्गे यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली़

A meeting with Alandi on road widening | रस्तारुंदीकरणाबाबत आळंदीत बैठक

रस्तारुंदीकरणाबाबत आळंदीत बैठक

आळंदी देवाची : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत आळंदी नगरपरिषद हद्दीतील हवेली भागातील रस्ता रुंदीकरण भूसंपादनविषयी आज नागरिक व हवेली प्रांत स्नेहल बर्गे यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली़
या बैठकीमध्ये अनेक नागरिक उपस्थित होते़ धाकटा पादुका ते नवीन एसटीस्टॅन्ड एवढाच रस्ता ४५ मीटर का? यावर प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी सांगितले की, हा प्रस्ताव नगरपरिषद आळंदी यांच्यामार्फत आला आहे़ ही बैठक शासकीय नसून नागरिकांची समस्या समजून घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी आहे़ या वेळी आळंदी नगरपरिषदेकडे हवेलीतील सर्व नगरसेवक व नगरसेविका, उपनगराध्यक्ष इत्यादी उपस्थित होते़ त्यांनी सांगितले की आम्ही ३५ मीटर रस्त्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे; मात्र तो ४५ मीटर झाला कसा़
या बैठकीत माजी नगरसेवक संतोष चोरडिया, भाऊ गिरजे, डॉ़ माटे, सुरेश तापकीर, संदीप भसे, भानुदास पिसाळ, माजी नगरसेवक कांतिलाल चोरडिया, माऊली चौधरी, चैतन्य तापकीर, माधुरी गोडसे, मा़ नगरसेविका मंगलाताई बेळकर यांच्यासह पीडित सर्व नागरिक उपस्थित होते़
या वेळी प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी सांगितले की, सदर प्रस्ताव हा पुन्हा नगरपरिषदेकडे पाठविला जाईल व त्यावर नगर प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी निर्णय घ्यावा. ते जो प्रस्ताव पाठवितील, तो शासन मान्य करून पुढील कार्यवाही केली जाईल़

Web Title: A meeting with Alandi on road widening