निरोपाची सभा १४ मार्चला

By Admin | Updated: March 10, 2017 05:08 IST2017-03-10T05:08:49+5:302017-03-10T05:08:49+5:30

काही पराभूत तर काही जिंकलेले. महापालिका निवडणुकीने त्यांच्यात हे अंतर पडले, पण सारेच मावळत्या सभागृहाचे सदस्य. निरोपाच्या सभेसाठी महापालिकेत गुरुवारी

Meeting on 14 March | निरोपाची सभा १४ मार्चला

निरोपाची सभा १४ मार्चला

पुणे : काही पराभूत तर काही जिंकलेले. महापालिका निवडणुकीने त्यांच्यात हे अंतर पडले, पण सारेच मावळत्या सभागृहाचे सदस्य. निरोपाच्या सभेसाठी महापालिकेत गुरुवारी जमले, पण निरोपाची ही सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे साऱ्यांचीच निराशा झाली. अखेरीस सभागृहाबाहेरच्या लॉबीत, पदाधिकाऱ्यांच्या दालनात व नंतर महापालिकेच्या आवारात गप्पांचे फड जमवून त्यांनी ही हौस भागवली.
निरोपाच्या या सभेसाठी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे हे प्रमुख पदाधिकारी तसेच जवळपास ४० नगरसेवक जमा झाले होते. त्यांच्यातील काहीजण सभागृहात बसलेही. मात्र गणपूर्ती होत नसल्याचे कारण देत सभा तहकूब करण्याचा निर्णय महापौर जगताप यांनी दिली. १४ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता सभा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बरोबर त्याच दिवशी या सभागृहाची मुदत संपुष्टात येत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ मार्चला महापालिकेचे १३ वे सभागृह अस्तित्त्वात येईल व त्यात ५६ व्या महापौरांची निवड होईल.
दरम्यान सभा तहकूब झाल्यामुळे जमलेल्या मावळत्या नगरसेवकांची निराशा झाली. त्यांनी मग उपमहापौर, महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनात गप्पांचा फड जमवला. उपमहापौरांच्या दालनात त्यांच्यासह नव्याने निवडून आलेले नगरसेवक दीपक मानकर, महेंद्र पठारे, संजय बालगुडे, दत्ता सागरे आदी जमले होते. महापौरांच्या दालनातही अशीच मैफली जमली होती.
(प्रतिनिधी)

बहुतेक ठिकाणच्या गप्पांचा सूर मतदान यंत्रांद्वारे फसवणूक करता येते का, हाच होता. त्यात कोणाला किती मते पडली, इतकी मते पडलीच कशी व फक्त इतकीच मते मिळणे शक्य नाही, अशा दोन्ही बाजू बोलल्या जात होत्या.
मुख्य इमारतीच्या आवारातही अनेक नगरसेवक जमून गप्पा मारत होते. त्यातही मतदान यंत्रांबद्धल तक्रार करण्यात येत होती. निवडणुकीत विजय मिळालेले नगरसेवक पराभूत नगरसेवकांच्या दु:खावर फुंकर मारत होते. महिला नगरसेवकांमध्येही हीच चर्चा होती. त्यातील काहीजणींना यायला उशीर झाला.
सभागृहात वर जाण्याची त्यांची घाई पाहून काही महिला नगरसेवकांनी अखेरच्या सभेलाही उशीरच केला, म्हणून त्यांची चेष्टा केली. त्यांनीही त्याला हसून दाद दिली. १४ मार्चच्या सभेला लवकर यायचे, असे ठरवूनच सर्वांनी निरोप घेतला.

Web Title: Meeting on 14 March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.