शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाणी चोरी व गळतीवर आता ‘मीटर वॉच’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 12:33 IST

शहरातील पाण्याची गळती आणि विविध मार्गांने होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे.

ठळक मुद्देसर्व पाण्याच्या टाक्या व प्रमुख लाईनला ३५० मीटर बसविणारमुख्य पाण्याची लाईन, मुख्य लाईनला जोडणाऱ्या लाईन, कॉर्स होणाऱ्या लाईन सर्व ठिकाणी मीटर ऑडिट झाल्यास पुणे शहराच्या पाण्याची अचूक गरज समजण्यास मदत होणार

पुणे : शहरातील पाण्याची गळती आणि विविध मार्गांने होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेकडून शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांना व प्रमुख लाईनवर मीटर बसविण्यात येणार आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण ३५० मीटर बसविण्यात येणार असून, आता पर्यंत ६० ते ७० मीटर बसविण्यात आले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.महापालिका मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असून, लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणी धरणातून पाणी उचलता असल्याचे सांगत जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाण्याला कट लावला होता. यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वादानंतर पुणे शहरातील एकूण लोकसंख्या व प्रत्यक्ष लागणारे पाणी याबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर पाण्याचे ऑडिट करून घेण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत.  पाण्याची होणारा गळती आणि प्रत्यक्षातील पाण्याचा वापर तसेच लोकसंख्येनुसार पालिकेला पाण्याची किती आवश्यकता आहे, याबाबतची योग्य माहिती समजण्यासाठी पाण्याचे ऑडिट आवश्यक आहे. ऑडिट झाल्यास पुणे शहराच्या पाण्याची अचूक गरज समजण्यास मदत होणार आहे.जलसंपदा विभागाच्या मागणीनुसार पुणे महापालिकेच्या वतीने वॉटर ऑडिट करण्याचे काम सुरु देखील झाले आहे. परंतु हे ऑडिट करताना शहरातील पाण्याची गळती व महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पाण्याची गरज, व्यावसायिकांना आवश्यक असलेले पाणी, वाया जाणारे पाणी आणि सर्वात महत्वाचे पाण्याची चोरी याची योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठीच महापालिकेच्या वतीने सर्व पाण्याच्या टाक्यांवर पाणी मीटर बसविणार आहे. तसेच मुख्य पाण्याची लाईन, मुख्य लाईनला जोडणाऱ्या लाईन, कॉर्स होणाऱ्या लाईन सर्व ठिकाणी मीटर बसविणार आहे. यामुळे शहरातील पाण्याची गळती व पाण्याची होणारी चोरी समजणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी