शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानांना सामोरे जा....'' लोकमत वुमेन समीट २०१९ '' परिसंवादातील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 11:30 IST

आज महिला आपणहून पुढे येत सारथ्याची भूमिका पार पाडत आहेत...

ठळक मुद्दे  ‘अग्निपंख’ या विषयावर आधारित परिसंवादात त्यांनी महिलांना मार्गदर्शनस्वाती मुजुमदार आणि रूपाली देशमुख यांनी दिला महिलांना यशस्वितेचा मूलमंत्र

पुणे : स्त्री-पुरूष भेद ही केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील समस्या आहे. आज असं कोणतेही क्षेत्र नाही जिथं महिला स्वत:ला सिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळं आपलं शिक्षण थांबवू नका आणि आव्हानांना सामोर जा....लक्षात घ्या एक दिवस यश तुमच्या हातात आहे.....अशा शब्दांत ‘लिव्ह टू लीड’ संकल्पनेवर आधारित ‘ लोकमत वुमेन समीट २०१९ ’’ परिषदेत सिंबायोसिसच्या संचालक डॉ. स्वाती मुजुमदार आणि जल व शाश्वत विकास तज्ञ (स्वीडन) रूपाली देशमुख यांनी महिलांना यशस्वीततेचा मूलमंत्र दिला. आनंदीबाई जोशी यांनी शिक्षणाचे ’अग्निपंख’ घेऊन देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला. आज महिला आपणहून पुढे येत सारथ्याची भूमिका पार पाडत आहेत. डॉ. स्वाती मुजुमदार आणि रूपाली देशमुख ही दोन त्याची प्रातिनिधिक उदाहरण आहेत. डॉ. स्वाती मुजुमदार यांनी अनेक वर्षे कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांमध्ये संशोधन करून भारतात  ‘कौशल्य विद्यापीठ’ विकसित करण्याच्या दृष्टीने मॉडेल विकसित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिली सिंबायोसिस कौशल्य आणि अभिमत विद्यापीठ’ सुरू करण्यात आले. तर रूपाली देशमुख यांनी जल आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परिषदेअंतर्गत झालेल्या  ‘अग्निपंख’ या विषयावर आधारित परिसंवादात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन उपयोग नाही तर त्यांच्यात कौशल्य विकसित करून स्वत:च्या पायावर उभं करण्याची खरी गरज आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती होण्याची आवश्यकता आहे. ज्या महिला बिकट परिस्थितीमुळे  दहावीपर्यंत देखील शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे. यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. रूपाली देशमुख म्हणाल्या, आज जगभरामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणी प्रश्न हा मुख्यत: महिलांशी निगडित आहे. त्यामुळे भारतात पाण्यासंबंधी कोणतही धोरण राबविताना त्यात महिलांचा सहभाग असणं आवश्यक आहे. त्यांचे मत विचारात घेतलं पाहिजे. आपल्याकडे जल आणि शाश्वत विकासाबाबत जनजागरूकता नाही. पाण्याचा किती वापर होतो त्याचा अभ्यास झाला पाहिजे.

परिसंवादाचे सूत्रसंचालन लीना सरढाणा-जोशी यांनी केले.

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटPuneपुणेLokmat Eventलोकमत इव्हेंटWomenमहिला