रेमडेसिविर ४५ हजारांना विकणाऱ्या मेडिकल दुकानदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST2021-05-20T04:10:09+5:302021-05-20T04:10:09+5:30

देवेंद्र काळुराम चौधरी (वय २५, रा. चिरके कॉलनी, लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार भरत पवार (रा़ ...

Medical shopkeeper arrested for selling Remedesivir for Rs 45,000 | रेमडेसिविर ४५ हजारांना विकणाऱ्या मेडिकल दुकानदाराला अटक

रेमडेसिविर ४५ हजारांना विकणाऱ्या मेडिकल दुकानदाराला अटक

देवेंद्र काळुराम चौधरी (वय २५, रा. चिरके कॉलनी, लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार भरत पवार (रा़ लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी औषध निरीक्षक श्रृतिका जाधव यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

ओमकार पवार यांचे वडील कोरोनामुळे आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पवार यांनी ४ रेमडेसिविर इंजेक्शन प्रत्येकी १३०० रुपयेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून विकत घेतली होती. त्यापैकी १ इंजेक्शन शिल्लक राहिले होते. त्यांनी ते देवेंद्र चौधरी याला बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी दिले. चौधरी याचे लोहगाव येथे शिव मेडिकल या नावाने दुकान आहे. चौधरी याने हे इंजेक्शन एकाला ४५ हजार रुपयांना बेकायदेशीररीत्या विकले. त्याची कोणतीही पावती करण्यात आली नाही. याबाबतची तक्रार मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने देवेंद्र चौधरी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Medical shopkeeper arrested for selling Remedesivir for Rs 45,000