पालिकेची घरपोच वैद्यकीय सेवा

By Admin | Updated: May 23, 2016 02:00 IST2016-05-23T02:00:35+5:302016-05-23T02:00:35+5:30

ज्येष्ठ व सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘आपला फॅमिली डॉक्टर’अंतर्गत २४ तास घरपोच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या उपक्रमाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते

Medical services in the city | पालिकेची घरपोच वैद्यकीय सेवा

पालिकेची घरपोच वैद्यकीय सेवा

पुणे : ज्येष्ठ व सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘आपला फॅमिली डॉक्टर’अंतर्गत २४ तास घरपोच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या उपक्रमाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते लोकार्पण रविवारी (दि. २२) भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, कै. वसंतराव बागुल उद्यान सहकारनगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिका आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी होते. या प्रसंगी डॉ. अनुराधा पुरोहित, डॉ. नितीन भगली, डॉ. एन. पी. राव, डॉ. गुजराथी, डॉ. यश बहुलीकर, डॉ. नितीन बोरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयोजन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले.
आपले आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांना असंख्य वैद्यकीय प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यांना अल्पशी मदत म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे बागुल म्हणाले.
ज्येष्ठ व सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आपला फॅमिली डॉक्टर अंतर्गत २४ तास घरपोच वैद्यकीय सेवा, घरपोच औषधे सेवा, डायग्नोस्टिक सेवा या उपक्रमांतर्गत सवलतीच्या दरात पुरवली जाणार आहे. तसेच विविध आजार, पॅरालिसिस, कॅन्सर, फ्रॅक्चर, शस्त्रक़्रियेनंतरची देखभाल, पार्किसन्स, डायबेटिस, बेडसोर्स आदी विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील. या उपक्रमातील औषध सेवेसाठी सहकारनगर नं. २ मधील सचिन मेडिकल, शिवदर्शन चौकातील नम्रता मेडिकल, अरण्येश्वरमधील न्यू शिवशाही मेडिकल, पद्मावतीतील न्यू ओम मेडिकल हे अल्पदरात सेवा देणार असून हा उपक्रम डॉक्टर कल्पेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविला जाणार आहे.
घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन तर अमित बागुल यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)

Web Title: Medical services in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.