शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जेवण अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:30 IST

समाजकल्याण अधिकाऱ्यांनी रखडलेली देणी देणे तसेच कंत्राट पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांचे जेवण बंद करण्याचा ठेकेदारांचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे ठेकेदारांनी सांगितले. 

ठळक मुद्देमागील काही महिन्यांपासून शासनाकडून देण्यात आलेली नाहीत काही ठेकेदारांची देणीकंत्राट पूर्ववत करणे व रखडलेली देणी देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर बंद मागे

पुणे : समाजकल्याण विभागाच्या शहर व जिल्ह्यातील पाच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचे जेवण बंद करण्याचा ठेकेदारांचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी रखडलेली देणी देणे तसेच कंत्राट पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ठेकेदारांनी सांगितले. समाजकल्याण विभागाने पुणे विभागातील ६०हून अधिक वसतिगृहांचा ठेका एका कंपनीकडे देण्यात आला आहे. या कंपनीकडून अन्य ठेकेदारांना ठेका देण्यात आला असून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जात आहे. मागील काही महिन्यांपासून शासनाकडून काही ठेकेदारांची देणी देण्यात आलेली नाहीत. तसेच त्यांचे कंत्राट ३० जुन रोजी संपले आहे. त्यानंतर आतापर्यंत ते पूर्ववत करण्यात आलेले नाही. याबाबत ठेकेदारांकडून समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतर दाद मिळाली नाही. त्यामुळे सोमवारी पुणे शहरातील तीन ठेकेदारांनी पाच ते सहा वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जेवणच बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ठेकेदारांनी जेवण बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजकल्याण अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ठेकेदारांचे मन वळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी फोनवरून चर्चा सुरू होती. मात्र, ठोस आश्वासन मिळत नसल्याने ठेकेदारही अडून बसले होते. पण दोन दिवसांत कंत्राट पूर्ववत करणे व रखडलेली देणी देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ठेकेदारांनी जेवण बंद करण्याचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे मंगळवारपासून या वसतिगृहातील जेवण पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती ठेकेदारांनी दिली. चांडोली राजगुरूनगर येथील मुलींची निवासी शाळा, मुलांचे वसतिगृह तसेच शिरूर येथील मुलींचे वसतिगृह, येरवडा येथील मुले व मुलींचे वसतिगृह येथील जेवण सोमवारी बंद करण्यात आले होते. येरवडा येथील वसतिगृहात सायंकाळी केवळ वरण-भात देण्यात आले. दत्ता कोल्हे, जितेंद्र मगर व गणेश घुले अशी या ठेकेदारांची नावे आहेत. सोमवारी दुपारी या विद्यार्थ्यांच्या जेवणाची बाहेरून व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी