Pune Crime: ऋषिकेश जगताप टोळीवर मोक्का, पाच साथीदारांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 09:58 AM2023-10-26T09:58:00+5:302023-10-26T09:58:27+5:30
सहकारनगर ( पुणे ) : जुन्या कारणावरून भर रस्त्यावर मारामारी करत तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून परिसरात दहशत पसरविल्याप्रकरणी ऋषिकेश जगताप ...
सहकारनगर (पुणे) : जुन्या कारणावरून भर रस्त्यावर मारामारी करत तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून परिसरात दहशत पसरविल्याप्रकरणी ऋषिकेश जगताप यांच्यासह त्याच्या पाच साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
ऋषिकेश दीपक जगताप (वय २५ ), संकेत ऊर्फ बल्ली राहुल वाघमारे (वय २०), निखिल बिभिषण लगाडे (वय २८), गणेश गौतम वाघमारे (वय १९), आदिनाथ सोपान साठे (वय २९), राम मोहन बनसोडे (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त परिमंडळ तीनचे सुहेल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त, सिंहगड रोड आप्पासाहेब शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक, चंद्रकांत कामठे, पोलिस अंमलदार कुंदन शिंदे, दीपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, जगदीश खेडकर यांनी केली आहे.
पोलिस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ७१ वी कारवाई आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त, सिंहगड रोड विभाग आप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत.