‘एमबीए’ची प्रवेशप्रक्रिया सुरू
By Admin | Updated: January 23, 2017 02:43 IST2017-01-23T02:43:59+5:302017-01-23T02:43:59+5:30
प्रथम वर्ष एमबीए व एमएमएस या व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.२१) सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना

‘एमबीए’ची प्रवेशप्रक्रिया सुरू
पुणे : प्रथम वर्ष एमबीए व एमएमएस या व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.२१) सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेशपरीक्षेसाठी (सीईटी) तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) संकेतस्थळावरून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. सीईटीच्या संभावित तारखा कक्षाकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. आता कक्षाकडून प्रत्येक अभ्यासक्रमाच्या सीईटीची स्वतंत्र प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार एमबीए व एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
प्रवेशासाठी ही सीईटी बंधनकारक आहे. अर्ज भरताना कोणतीही शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी लागणार नसल्याचे कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)