श्रीराम मंदिर उभारणीसाठी मयूरेश्वराचे कृपाशीर्वाद : स्वामी गोविंददेव गिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST2021-02-08T04:09:50+5:302021-02-08T04:09:50+5:30
चिंचवड देवस्थानकडून २१ लाखांची देणगी बारामती : आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी मोरया गोसावी यांच्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट मार्फत ...

श्रीराम मंदिर उभारणीसाठी मयूरेश्वराचे कृपाशीर्वाद : स्वामी गोविंददेव गिरी
चिंचवड देवस्थानकडून २१ लाखांची देणगी
बारामती :
आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी मोरया गोसावी यांच्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट मार्फत रविवारी (दि. ७) एकवीस लाख रुपयांचा धनादेश श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडे देण्यात आला. देणगी स्वीकारताना स्वामी म्हणाले की, देवस्थान मार्फत मिळालेली ही देणगी म्हणजे गणेशाचा प्रसाद आहे. मंदिर उभारण्यासाठी मयूरेश्वराचे कृपा आशीर्वाद आहेत.
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने रविवारी आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे विश्वस्त स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांकडे एकवीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार उपस्थित होते.
आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी तीनशे-चारशे कोटी रुपये तर इतर विकासकामांसाठी अकराशे कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. मुख्य मंदिराचे काम तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण होणार आहे. यामुळे मंदिर उभारणीस आर्थिक मदत देण्या संदर्भात चिंचवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत २१ लाख रुपये देण्याचे सर्वानुमते ठरवले होत. यानुसार आपली सामाजिक बांधीलकी या नात्याने आज श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या पुणे येथील आश्रमात जाऊन धनादेश देण्यात आला. स्वामी गोविंददेव गिरी यांचा सत्कार मंदार देव यांसह विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार या विश्वस्तांनी शाल व मोरया गोसावी यांचा फोटो देऊन केला.