‘पुरुषोत्तम’च्या धर्तीवर आता महापौर करंडक
By Admin | Updated: March 21, 2015 00:18 IST2015-03-21T00:18:55+5:302015-03-21T00:18:55+5:30
महाविद्यालयीन युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू होणाऱ्या पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धेच्या धर्तीवर महापालिकेकडूनही महापौर करंडक नाट्य स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे.

‘पुरुषोत्तम’च्या धर्तीवर आता महापौर करंडक
पुणे : महाविद्यालयीन युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू होणाऱ्या पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धेच्या धर्तीवर महापालिकेकडूनही महापौर करंडक नाट्य स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास मुख्य सभेत शुक्रवारी एकमताने मान्यता देण्यात आली. संयोजनाचे सर्व अधिकार महापौरांना देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी; तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘पुरुषोत्तम’च्या धर्तीवर नाट्य स्पर्धा सुरू करावी. यामध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य या विभागात युवकांच्या साह्याने विविध स्पर्धांचे आयोजन करावे, याबाबतचा प्रस्ताव माजी स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे आणि सभागृह नेते सुभाष जगताप यांनी दिला होता. मागील वर्षी डिसेंबर२०१४ मध्ये स्थायी समितीने या प्रस्तावास मान्यता दिल्या नंतर आज झालेल्या मुख्य सभेत तो ठेवण्यात आला होता. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी मान्यता दिली. (प्रतिनिधी)
पालिकेच्या नाट्यगृहांचा होणार वापर
४शहरात महापालिकेची सहा ते सात लहान-मोठी नाट्यगृहे आहेत. त्यातील गणेश कला क्रीडा मंच, बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह वगळता इतरांचा फारसा वापर होत नाही. पालिकेकडूनच स्पर्धा सुरू करण्यात येत असल्याने नाट्यगृहांचा वापर होणार आहे.