महापौर चषक: मंडप व्यवस्थेत गैरव्यहार
By Admin | Updated: April 24, 2015 03:29 IST2015-04-24T03:29:20+5:302015-04-24T03:29:20+5:30
नुकत्याच पार पडलेल्या महापौर चषक स्पर्धेअंतर्गत ज्युदो स्पर्धेच्या बिलामध्ये स्टेड, मांडव, खुर्च्या आदी साहित्य पुरविताना जास्त बिल लावून गैरव्यवहार

महापौर चषक: मंडप व्यवस्थेत गैरव्यहार
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या महापौर चषक स्पर्धेअंतर्गत ज्युदो स्पर्धेच्या बिलामध्ये स्टेड, मांडव, खुर्च्या आदी साहित्य पुरविताना जास्त बिल लावून गैरव्यवहार करण्यात आल्याची तक्रार सावरकर क्रिडा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व बिले मंजूर करणाऱ्या क्रिडा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे
विविध ठिकाणी मंडप व इतर साहित्य पुरविणे यासाठीचे टेंडर भवन खात्यातर्फे काढण्यात आले होते. त्यासाठी सादर करण्यात आलेली बिले ही जास्तीची लावण्यात आली आहेत. भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे असा आरोप सावरकर क्रिडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र धावडे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)