शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांच्या पाण्यासाठी महापौरांचा रुद्रावतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 20:26 IST

पाटबंधारे विभागाकडून पुणेकरांना वेठीस धरण्याचे काम सुरु असून, कोणतीही पूर्व कल्पना न देता बुधवारी (दि.१६) अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला.

पुणे: पाटबंधारे विभागाकडून पुणेकरांना वेठीस धरण्याचे काम सुरु असून, कोणतीही पूर्व कल्पना न देता बुधवारी (दि.१६) अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला. पाटबंधारे विभागाच्या या मनमानी कारभाराचे तीव्र पडसाद महापालिकेच्या वर्तुळात उमटले. मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील पाटबंधारे विभागाचे अधिकारी ऐकत नसतील तर मुजोर अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक स्वत: गुरुवार (दि.१७) रोजी सिंचनभवन येथे जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना शहरामध्ये फिरकू देणार नाही, असा इशाराही टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

महापालिका कालवा समिती व जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाचा दाखला देत पाटबंधारे विभागाने गेल्या काही दिवसांत तीन वेळा अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, शहरात पाणी कपात करण्यात येऊ नये अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. पुणे दौ-यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करू नये असे थेट आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले होते. त्यानंतर देखील पुण्यातील पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार सुरुच असून, बुधवारी (दि.१६)  दुपारी पर्वती पंपिंग स्टेशनचा पाणी पुरवठा अचानक बंद केला. यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून पाणी पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Mukta Tilakमुक्ता टिळकWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका