महापौर राष्ट्रवादीला उपमहापौर काँग्रेसला
By Admin | Updated: September 3, 2014 01:00 IST2014-09-03T01:00:43+5:302014-09-03T01:00:43+5:30
महापालिकेच्या सत्ताधारी आघाडीतील महापौरपदावर काँग्रेसने दावा केला. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली होती.

महापौर राष्ट्रवादीला उपमहापौर काँग्रेसला
पुणो : महापालिकेच्या सत्ताधारी आघाडीतील महापौरपदावर काँग्रेसने दावा केला. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली होती. परंतु, महापौरपदावर राष्ट्रवादी ठाम राहिल्यामुळे काँग्रेसने उपमहापौरपदासाठी उद्यापासून (बुधवार) इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत.
महापौर चंचला कोद्रे व उपमहापौर बंडू गायकवाड यांची मुदत संपत आहे. नवीन महापौर व उपमहापौर पदांसाठी 1क् सप्टेंबर्पयत इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही पदांची निवड प्रक्रिया 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता होणार आहे. राष्ट्रवादीकडे महापौरपदासाठी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, विकास दांगट, बाबूराव चांदेरे, बाळासाहेब बोडके, सचिन दोडके व प्रशांत जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांपैकी कोणाच्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करणार, याची उत्सुकता आहे.
दरम्यान, उपमहापौरपदासाठी आरक्षण नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून बुधवारपासून अर्ज मागविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
च्काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या उपस्थिती आठवडय़ापूर्वी झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या पदासाठी नवीन चेह:यांना संधी देण्याचा ठराव झाला आहे. त्यामध्ये आतार्पयत ज्यांना संधी मिळाली नाही, अशा नवीन चेह:याला संधी देण्याची मागणी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे ठरावाद्वारे केली. त्यामुळे काँग्रेसमधून उपमहापौरपदासाठी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.