अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:35+5:302021-09-06T04:15:35+5:30
पुणे : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय ...

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय महापौर परिषद ही राष्ट्रीय स्तरावरील महापौरांची परिषद आहे. परिषदेचे अध्यक्ष आणि आग्र्याचे महापौर नवीन जैन यांनी, उपाध्यक्षपदी महापौर मोहोळ यांची निवड केली. महापौर मोहोळ यांच्या निमित्ताने पुणे शहराला हा बहुमान मिळाला आहे.
या निवडीबद्दल मोहोळ म्हणाले की, आपल्या कामाची आणि पदाला न्याय देण्याची दखल घेतली जाते. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान देणारे आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद म्हणजे, केवळ माझाच नाही, तर तमाम पुणेकरांचा सन्मान आहे. यामुळे काम करण्याचा उत्साह, तर आणखी वाढेलच शिवाय जबाबदारीची जाणीवही आणखी घट्ट होत आहे.