शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 17:28 IST

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियोजनांची माहिती दिली आहे.

पुणे : शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून दिवसभरात दोन ते तीन हजार कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र हा आकडा आता वीस हजारांवर पोहोचला आहे.  कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त लसीकरण व्हायला हवं, यासाठी पुण्यात चोवीस तास लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'लोकमत'शी बोलताना माहिती दिली.महापौर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे, ''सध्या शहरात १०९ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. आत्तापर्यंत सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरात लवकर कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. खासगी हॉस्पिटल मधील ५० टक्के बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या महापालिकेकडे ५ हजार पाचशे बेड उपलब्ध आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी शहरात ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू आहेत.  शहराच्या प्रत्येक भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. पुणे शहरात २४ तास लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सुतार हॉस्पिटल, कमला नेहरु हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल या केंद्रांवर प्रामुख्यानं २४ तास लसीकरण सुरु राहील.''लायगुडे हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण आणि उपलब्ध लसींचा साठा यात तफावत होती. लस कमी पडत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी होत्या. मात्र त्यावर स्पष्टीकरण देताना महापौर म्हणालेत की, ''केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून महापालिका लस पुरवठा वाढवून घेण्यावर भर देत आहे. पुण्यात कोणत्याही हॉस्पिटलची जेवढी मागणी असते त्याप्रमाणे तिथे कोरोना लसीचा साठा पुरवण्यात येत आहे.''ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत पण ते घरात क्वारंटाईन राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी 'कोविड केअर सेंटर्स' पुण्यातील येरवडा, खराडी, चंदननगर, कोंढवा या भागात एक हजार बेड्स उपलब्ध झाले आहेत. पुण्याच्या सर्व भागात 'कोविड केअर सेंटर्स' उभे करावेत आणि साधारण पाच हजार बेड्सचं नियोजन असल्याचंही महापौर यांनी यावेळी सांगितलं. शिवाय सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यावर्षीप्रमाणे लवकरच 'कोविड केअर सेंटर' सुरु होणार आहे. बालेवाडीला साडेआठशे बेड्सचं 'कोविड केअर सेंटर' सुरु होणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या