महापौर, उपमहापौरपद; आज होणार निवडणूक

By Admin | Updated: September 15, 2014 05:07 IST2014-09-15T05:07:46+5:302014-09-15T05:07:46+5:30

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे़

Mayor, Deputy Mayor; Today will be the election | महापौर, उपमहापौरपद; आज होणार निवडणूक

महापौर, उपमहापौरपद; आज होणार निवडणूक

पुणे : महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे़ या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून दत्तात्रय धनकवडे व युतीकडून भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर यांच्यात लढत होणार आहे़, तर उपमहापौरपदासाठी आबा बागुल आणि भरत चौधरी यांच्यात लढत होत आहे़ पालिकेत आघाडीचे बहुमत असल्याने धनकवडे आणि बागुल यांची निवड निश्चित मानली जात आहे़
महापौर आणि उपमहापौर यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने या निवडणुका होत आहे़ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता ही निवडणूक होणार आहे़ जिल्हाधिकारी सौरभ राव हे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत़ खुल्या वर्गासाठी असलेल्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दत्तात्रय धनकवडे यांना उमेदवारी दिली आहे़ युतीने भाजपाचे योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे़ उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून आबा बागुल यांना उमेदवारी मिळाली आहे, तर युतीकडून शिवसेनेचे भरत चौधरी लढत देत आहे़
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस ५२, काँग्रेस २९, रिपब्लिकन पक्ष २ आणि अपक्ष १ असे ८१ नगरसेवकांचे बळ आघाडीकडे आहे़ भाजपा व शिवसेनेकडे ४१ नगरसेवक असून, मनसेचे २८ नगरसेवक तटस्थ राहण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांची निवड निश्चित समजली जाते़
महापौर, उपमहापौरपदी निवड झाली तरी आचारसंहिता सुरू असल्याने, त्यांना या पदाचा प्रत्यक्ष लाभ विधानसभा निवडणुकीनंतरच घेता येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Mayor, Deputy Mayor; Today will be the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.