तारखेची कमाल, सेवानिवृत्तीची धमाल!

By Admin | Updated: May 5, 2016 04:21 IST2016-05-05T04:21:56+5:302016-05-05T04:21:56+5:30

जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते. काही वर्षांपूर्वी शाळेत प्रवेश घेताना जर एखाद्या मुलाची जन्मतारीख पालकांना माहिती नसल्यास थेट १ जून जन्मदिनांक सर्रासपणे सांगितली जात होती.

Maximum date, retirement benefits! | तारखेची कमाल, सेवानिवृत्तीची धमाल!

तारखेची कमाल, सेवानिवृत्तीची धमाल!

पिंपरी : जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते. काही वर्षांपूर्वी शाळेत प्रवेश घेताना जर एखाद्या मुलाची जन्मतारीख पालकांना माहिती नसल्यास थेट १ जून जन्मदिनांक सर्रासपणे सांगितली जात होती. अशिक्षित पालक शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे तारखा लिहिण्यास सांगत होते. त्यामुळे इतर महिन्यातील जन्म असला, तरी १ जून ही तारीख ठरलेली असायची. पूर्वी जन्माची नोंद व्यवस्थितरीत्या होत नसत अथवा त्यासाठी कोणी तसदीही घेत नसत. पण त्याचा फटका आता निवृत्तीच्या वेळी बसत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून १ जून हा जन्मदिनांक असलेले ४३ अधिकारी, कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त होत आहेत.
महिन्याला सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या मे महिन्यात पाच पटीने वाढणार आहे. ५३ जण निवृत्त होत असताना यामध्ये तब्बल ४३ जणांचा जन्मदिनांक १ जून आहे. त्यामुळे खरोखरच ४३ जण एकाच दिवशी जन्माला आले का, असा मुद्दा उपस्थित होतो. मात्र, तसे नसून पूर्वीची गोष्ट वेगळी होती. त्या काळात शाळा प्रवेशासाठी १ जून दिनांक टाकला जात होता. त्यामुळे अनेक जणांची जन्मतारीख १ जून झाली आहे. त्याचा फटका आता जाणवत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील अधिकारी ३१ मेला निवृत्त होतात. त्यामुळे या दिवसाची ओळख सेवानिवृत्त दिन अशी होत आहे. (प्रतिनिधी)

हे होणार सेवानिवृत
शहर अभियंता महावीर कांबळे, सहायक आयुक्त दत्तात्रय फुंदे, सहायक आरोग्याधिकारी जनार्दन जानकर, मुख्याध्यापक अंकुश पंढरी, सुधा कदम, मुख्य लिपिक ज्ञानदेव जासूद, राजाराम कुदळे, अर्जुन पाटील, श्याम लांडगे, सुरेश गोरे, उपअभियंता दिलीप सोनवणे आदींचा समावेश आहे.

...असे काही किस्से
ग्रामीण भागामध्ये साठ वर्षांपूर्वी जन्म झालेल्या मुलांच्या जन्मांमध्ये चार-दोन दिवसांचा फरक होता. पण काही जणांच्या पालकांनी मुलाला लवकर शाळेत घालण्यासाठी जन्मतारखा बदलल्या आहेत. त्यामुळे लवकर शाळेत गेलेले लवकर सेवानिवृत्त होत आहेत, तर उशिरा शाळेत गेलेले उशिरा निवृत्त होत आहेत. त्याचा फटका काही जणांना बसला आहे. पण आता केवळ चर्चाच करावी लागत आहे. कारण याला कोणत्याही पर्याय नाही.

जन्मतारखा अद्ययावत करण्याची मागणी
जन्मतारखा अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. दर वर्षी जूनमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होतील. त्याचा त्रास प्रशासकीय यंत्रणेला होणार आहे. तसेच सेवानिवृत्तीच्या रकमा मोठ्या प्रमाणात द्याव्या लागल्याने तिजोरीवरही भार वाढणार आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

अनेक जणांचा होतोय तोटा
लवकर सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक जणांना सेवानिवृत्ती पत्कारावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पण जन्मतारखा सारख्या असल्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही.सेवानिवृत्तीनंतर काय कऱ्याचे याचे नियोजन केलेले असते. काही जणांना सेवानिवृत्तीनंतर नोकरीची आवश्यकता असते.

Web Title: Maximum date, retirement benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.