मावळ तालुक्यात दुपारी दिड पर्यत ૪०.५१ टक्के मतदान
By Admin | Updated: February 21, 2017 15:25 IST2017-02-21T15:25:14+5:302017-02-21T15:25:14+5:30
मावळ तालुक्यात आज सकाळी २१६ मतदान केंद्रावर पंचायत समितीच्या १० व पुणे जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली.

मावळ तालुक्यात दुपारी दिड पर्यत ૪०.५१ टक्के मतदान
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 21 : पुणे जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असा नावलौकिक असलेल्या मावळ तालुक्यात आज सकाळी २१६ मतदान केंद्रावर पंचायत समितीच्या १० व पुणे जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली. संथ गतीने सकाळच्या सत्रात सुरु झालेल्या मतदानाला दुसर्या सत्रानंतर चांगला जोर धरल्याने दुपारी दिड वाजेपर्यत मावळात ૪०.५१ टक्के मतदानांची नोंद करण्यात आली.
ग्रामीण भागात तसेच ज्या गावातून उमेदवार आहेत. तेथून मतदानांचा वेग चांगला असला तरी शहरी भागात काही प्रमाणात प्रतिसाद कमी जाणवत आहे. कुसगाव, वडगाव, कामशेत, वडेश्वर, टाकवे या मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या.
मावळातील कार्ला व शिलाटणे या गावातील मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र बनविण्यात आली असून येथे मतदारांसाठी सभामंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मतदान करणार्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात होते. तसेच मतदान केंद्रावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. मावळात मतदान शांततेमध्ये सुरु आहे