शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

रूप पाहतां लोचनीं,सुख जालें वो साजणी..! आळंदीत माऊलींचे मंदिर दर्शनासाठी खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 10:18 IST

Alandi Mauli Mandir : मंदिर उघडण्यावेळी दिवाळीपाडवा मुहूर्त असल्याने भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आळंदी  - दिवाळी पाडव्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. यापार्श्वभूमीवर आज (दि.१६) सकाळी सहा वाजल्यापासून तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, तमाम भाविकांना माऊलींच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. त्यातच मंदिर उघडण्यावेळी दिवाळीपाडवा मुहूर्त असल्याने भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार मागील आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. मात्र यादरम्यान देवाचे उपचार नैमित्तिक परंपरा अखंड सुरु होते. सोशल मीडियावर दैनंदिन माउलींचे समाधी दर्शन सुरू होते. मात्र राज्य सरकारने सोमवारपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यापार्श्वभूमीवर माऊलींचे समाधी मंदिर सकाळी सहापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दरम्यान पहाटे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते माऊलींची विधिवत महापूजा होईल.  दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रथम थर्मल स्कॅनिंग केली जाईल. त्यानंतर प्रत्येकाला सॅनिटाझर करून दर्शनबारीद्वारे आजोळघरातून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. पंखामंडपातून माऊलींचे मुख दर्शन झाल्यानंतर पाणदरवाज्यातून भाविकांना बाहेर सोडले जाणार आहे. साधारण दर दोन - तीन तासांनी मंदिराची स्वच्छता व सॅनिटायझेशेन केले जाणार आहे. त्यादरम्यान भाविकांना दर्शन बंद केले जाईल. भाविकांनी मंदिरात येण्यापूर्वी रांगेतून येताना हस्तांदोलन करु नये. सोशल डिस्टन्सिंग पाळावेच. कोविड सदृश लक्षणे  ज्यांना असतील, त्यांनी इतरांचे आरोग्य जपण्यासाठी मंदिर प्रवेश टाळावा. भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.

टॅग्स :AlandiआळंदीPuneपुणेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक