शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मदरशातील मुलांचे लैंगिक शोषण करणा-या मौलानाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 20:08 IST

रात्रीच्या वेळी मौलाना तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून १० वर्षांची दोन मुले २३ जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती.

ठळक मुद्देपीडित चिमुरड्यांनी याबाबत एका संस्थेकडे वाच्यता केल्याने ही धक्कादायक बाब समोरआरोपी मौलानांविरुद्ध शुक्रवारी रात्री भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : कात्रजमधील जामीया अरबिया दारूल यतामा या मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी आलेल्या २ मुलांवर लैंगिक आत्याचार केल्याप्रकरणी तेथील  मौलानाची ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.      हा घृणास्पद प्रकार उघड झाल्यानंतर सर्व मुलांना शिवाजीनगर येथील बालगृहात ठेवण्यात आले आहेत. मदरशामध्ये एकूण ३५ मुले होती. त्यातील किती मुलांवर मौलानाने अत्याचार केला याचा तपास पोलीस करत आहेत. पीडित चिमुरड्यांनी याबाबत एका संस्थेकडे वाच्यता केल्याने ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशीरा भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मौलाना रहीम (पूर्ण नाव व पत्ता नाही) असे अटक करण्यात आलेल्या मौलानाचे नाव आहे. बालहक्क कार्यकर्त्या डॉ. यामिनी अद्वैत अडबे (वय ५४) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. अटक करून रहीम याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.      मौलाना रहीम हा मदरशातील मुलांना धार्मिक शिक्षण देतो. रात्रीच्या वेळी तो तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करीत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून १० वर्षांची दोन मुले २३ जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती. स्टेशनवरील पोलिसांना ही मुले संशयास्पद रित्या फिरताना दिसून आली. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, मदरशातून पळून आल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे त्यांना साथी संस्थेकडे देण्यात आले होते. डॉ. यामिनी अडबे यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांची विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी दोन्ही मुलांवर मौलाना रहीम हा रात्रीच्या वेळी लैंगिक अत्याचार करत होता. त्याला विरोध केल्यास तो शिवीगाळ करून काठीने मारहाण करत. त्यामुळे घाबरून आम्ही पळून आला आहोत, असे त्यांनी सांगितले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर डॉ. अडबे यांनी त्वरीत पोलीस आयुक्तालयात रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशानुसार त्वरीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :katrajकात्रजMuslimमुस्लीमCrimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय