पांडुरंग विद्यामंदिरात गणित दिनानिमित्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:11 IST2020-12-24T04:11:32+5:302020-12-24T04:11:32+5:30

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त श्री पांडुरंग विद्यामंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या ...

Mathematics Day activities at Pandurang Vidyamandir | पांडुरंग विद्यामंदिरात गणित दिनानिमित्त उपक्रम

पांडुरंग विद्यामंदिरात गणित दिनानिमित्त उपक्रम

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त श्री पांडुरंग विद्यामंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या वेळी भाऊसाहेब वाघ, मारुती निकम, प्रभाकर चांदगुडे, अरुण शिंदे, विशाल कुंभार, प्रवीणकुमार जगताप, बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गणितीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजूषा स्पर्धेत लहान गटात श्रेया रायकर व तेजस्विनी शितोळे तर मोठ्या गटात समीक्षा शिंदे व प्रियंका जाधव यांच्या रामानुजन गटांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

लहान गटात ईश्वरी गवारी, तनुष्का गवारी यांच्या गटाने द्वितिय तर प्रज्ञा जठार, साई गवारी यांच्या गटाने तृतीय क्रमांक मिळविला आणि मोठ्या गटात अभय गवारी व ओंकार कापरे यांच्या गटाने द्वितीय तर अविनाश शेलार व शाम अलगोत्तर यांच्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला.

--

फोटो : २३ तळेगाव ढमढेरे गणित दिन

फोटो ओळ: राष्ट्रीय गणित दिनानिमित्त श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना भाऊसाहेब वाघ, मारूती निकम, प्रभाकर चांदगुडे आदी

Web Title: Mathematics Day activities at Pandurang Vidyamandir