माथाडी कार्यकर्त्यांना येरवडा पोलिसांकडून अटक
By Admin | Updated: June 4, 2014 22:22 IST2014-06-04T22:11:38+5:302014-06-04T22:22:49+5:30
फर्निचर दुकानातील माल उतरवू देण्यासाठी 7 हजारांची खंडणी मागणा-या दोन माथाडी कामगारांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

माथाडी कार्यकर्त्यांना येरवडा पोलिसांकडून अटक
पुणे : फर्निचर दुकानातील माल उतरवू देण्यासाठी 7 हजारांची खंडणी मागणा-या दोन माथाडी कामगारांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
रविंद्र ज्ञानेश्वर गायकवाड (वय 42, रा. गांधीनगर, येरवडा), मोहसीन याकुब खान (वय 25, रा. जयप्रकाश नगर, येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र मनोहर मोरे (वय 39, रा. लोहगाव रस्ता, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. मोरे हे निलकमल या फर्निचर कंपनीचे मॅनेजर आहेत. त्यांचे इशान्य मॉलमध्ये दुकान आहे. इशान्य मॉलमधील माल पंचशील टेकपार्क येथे देण्यासाठी कंपनीचा टेम्पो गेला असता तेथे असलेल्या आरोपींनी माल उतरवू देण्यासाठी 7 हजारांची मागणी केली.
आपण माथाडी कामगार असून पैसे दिल्याशिवाय माल उतरवू देणार नसल्याची त्यांनी धमकी दिल्यामुळे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली.