महापौरपद निवडीत खडकवासल्याचे गणित

By Admin | Updated: September 11, 2014 04:38 IST2014-09-11T04:38:58+5:302014-09-11T04:38:58+5:30

पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीसाठी खडकवासला मतदारसंघाचे गणितच महत्त्वाचे ठरले.

Math | महापौरपद निवडीत खडकवासल्याचे गणित

महापौरपद निवडीत खडकवासल्याचे गणित

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीसाठी खडकवासला मतदारसंघाचे गणितच महत्त्वाचे ठरले. खडकवासल्याचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे धनकवडी परिसरातील असल्याने त्यांना रोखण्यासाठीच दत्तात्रय धनकवडे यांना महापौरपद देण्यात आले आहे.
नगरसेवक दत्तात्रय धनकवडे राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. हवेली पंचायत समिती उपसभापती व बाजार समिती संचालक म्हणून त्यांनी कामे केलेली आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत धनकवडे यांना महापालिकेत कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नव्हते. खडकवासला मतदारसंघात ते दावेदार मानले जात होते. धनकवडे यांना महापौरपद देण्यासाठी नगरसेवक अप्पा रेणुसे, विशाल तांबे, शिवलाल भोसले, मोहिनी देवकर, सुवर्णा पायगुडे, भारती कदम, पिंटू धाडवे, संतोष फरांदे व युवक शहराध्यक्ष अजित बाबर यांनी एकत्रित शिफारस अजित पवार यांच्याकडे केली होती.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपमहापौरपदासाठी आतापर्यंत संधी न मिळालेल्या उमेदवाराला संधी देण्याचा ठराव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. तरीही ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी थेट मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडून उपमहापौरपद आणल्याची चर्चा आहे. बागुल यांना स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते, विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव आहे. महापालिकेत काँग्रेस आघाडीचे बहुमत आहे. औपचारिक निवड १५ सप्टेंबरला होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.