साहित्यातून माणूसपणाचा ठाव

By Admin | Updated: March 26, 2015 00:27 IST2015-03-26T00:27:35+5:302015-03-26T00:27:35+5:30

खोडकर मुलगा, प्रेमळ वडील असे वपुंच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडत त्यांच्यातल्या माणूसपणाचा ठाव घेणारी साहित्य सफर पुणेकरांनी बुधवारी अनुभवली.

Materiality of manhood | साहित्यातून माणूसपणाचा ठाव

साहित्यातून माणूसपणाचा ठाव

पुणे : एक आर्किटेक्ट, सिद्धहस्त लेखक, चोखंदळ श्रोता, कसबी कथाकथनकार, खोडकर मुलगा, प्रेमळ वडील असे वपुंच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडत त्यांच्यातल्या माणूसपणाचा ठाव घेणारी साहित्य सफर पुणेकरांनी बुधवारी अनुभवली.
निमित्त होते व. पु. काळे यांच्या ८३व्या जयंतीनिमित्त धुळ्यातील वि. का. राजवाडे संशोधन मंडळातर्फे ‘व. पु. एक अमृतानुभव’ या कार्यक्रमाचे. अभिनेते प्रदीप वेलणकर, लेखिका डॉ. वीणा देव, कथाकथनकार रेखा मुंदडा, मेहता पब्लिकेशन्सचे अनिल मेहता, शिरीष रायरीकर उपस्थित होते.
वपु यांच्या कन्या स्वाती चांदोरकर म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे एक प्लेझर बॉक्स असे. त्यामध्ये वाचकांची काही पत्रे लिखाणाचे कौतुक करणारी तर काही टीकात्मक. अशा पत्रांवर बापू व. पु. काळे म्हणत ‘हे माझ्यासाठी एक आव्हान आहे.’ लिखाणात तोचतोचपणा येतोय, त्यामुळे लिखाण बंद करा, अशा वाचकांच्या पत्रावर बापू म्हणत, वाचकांच्या नाडीची ओळख असल्यामुळे जगण्याचा आनंद हा शब्दांतूनच शोधता येतो. या पत्रव्यवहारमुळे बालपण समृद्धी, शब्दसंपत्तीमध्ये गेले. कुटुंबामध्ये कोणी कथाकथनकार न झाल्याची खंतही ते नेहमी व्यक्त करीत, अशी
आठवण चांदोरकर यांनी रसिकांसमोर मांडली.
व. पु. काळे यांच्या काही चित्रफितीही दाखविण्यात आल्या.
(प्रतिनिधी)

कादंबरीमध्ये जिवंतपणा संवादामुळे येतो, हेच कौशल्य त्यांच्याकडे होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे चांगली कथा पुस्तकामध्ये संपल्यानंतर ती वाचकांच्या मनात सुरू होते. ते अत्यंत प्रेमळ, उत्साही, माणसांचे सेतू जोडणारे होते.
- डॉ. वीणा देव

Web Title: Materiality of manhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.