शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बिबवेवाडी येथील मांडव गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाच्या ६ गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 18:43 IST

आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या दाखल...

बिबवेवाडी : बिबवेवाडी येथील पीएमटी कॉलनीमध्ये असलेले त्रिमूर्ती डेकोरेटर्सच्या मांडव गोदामाला दुपारी २.४५ मिनिटांनी भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या. 

बिबवेवाडी येथील पोकळे वसाहत मध्ये पी एम टी कॉलनी तील त्रिमूर्ती डेकोरेटर यांच्या मांडव गोदामाला  दुपारी २.४५ मिनिटांनी भीषण आग लागून गोदामातील लग्न समारंभ कार्यात लागणारे  सजावटीचे साहित्य आगी मध्ये भस्म सात झाले.ही आग इतकी भीषण होती की बिबवेवाडी परिसरात दुरुन  सुद्धा काळा धुराचे लोळ दिसत होते.मांडव गोदामाच्या लागूनच असलेल्या घरांमधील नागरीक घाबरून घराबाहेर पळाले परंतु येथील घरांचे मात्र या आगीमुळे मोठे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कोंढवा, कात्रज व अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयातून अशा एकूण सात गाड्या, तीन देवदूत गाड्या व तीन पाण्याच्या टॅंकरच्या मदतीने आग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. 

या आगीच्या भीषण दुर्घटनेत गोदामातील कापडी पडदे, खुर्च्या ,सोफे, सजावटीसाठी लागणारे लोखंडी साचे, प्लॅस्टिकची फुले असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागण्याचे कारण अजून ही अस्पष्ट असून पुढील तपास अग्निशामक दल प्रमुख प्रशांत रणपिसे करत आहे.गोदामाला लागलेल्या या भीषण आगीमुळे गोदामाला लागून असलेल्या आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीची झळ इतकी प्रचंड होती की या घरांच्या भितीना तडा गेला असून गच्चीवरील पाण्याअ च्या टाक्या देखील वितळून गेल्या होत्या.................................................................................बिबवेवाडी येथील पोकळे वसाहती मध्ये अरुंद रस्त्यांचा व रस्त्यावरील पार्क केलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे. त्यातच येथे मांडव गोदामाला आग लागल्यामुळे इथे अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोकळा रस्ता मिळतं नव्हता. त्यामुळे देखील येथे आग विजवण्याच्या कार्यात आड थळा निर्माण होत होता.

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल