शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मसाले, भेंडी, गुलाब यांना अमेरिका, बहारीनच्या बाजारात डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:53 IST

आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करण्यासाठी पणन मंडळाने राज्यात ४४ सुविधा केंद्रांची उभारणी केली. त्या माध्यमातून डाळींब, केळी, आंबा, संत्रा ही फळे आणि भेंडी, कारले, शेवगा, तोंडली आणि मिरची अशा भाज्यांची निर्यात करण्यात आली. 

ठळक मुद्देराज्यात २१ निर्यात केंद्र असून त्यात ३५ शीतगृह, १९ प्रशितकरण १९ आणि फळे पिकविण्याची ११ केंद्र आहेत२६ कोटी ५५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा २७६१.४१ टन शेतमाल जर्मनी, नेदरलँड, थायलंड, दोहा, बहारीन, अमेरिकेत निर्यात

पुणे : राज्यातून भेंडी, कारले, शेवग्यासह मसाले आणि गुलाब परदेशातील बाजारात दाखल झाले आहेत. पणन मंडळाच्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यांत तब्बल २७६१.४१ टन शेतमाल अमेरिका, बहारीनसह अन्य देशांत निर्यात झाला आहे. राज्यातील फळे आणि भाजीपाल्याला परदेशी बाजारपेठ मिळावी आणि निर्यातीत वाढ व्हावी या साठी राज्यात पायाभूत सुविधांची वाणवा होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करण्यासाठी पणन मंडळाने राज्यात ४४ सुविधा केंद्रांची उभारणी केली. त्या माध्यमातून डाळींब, केळी, आंबा, संत्रा ही फळे आणि भेंडी, कारले, शेवगा, तोंडली आणि मिरची अशा भाज्यांची निर्यात करण्यात आली. राज्यात २१ निर्यात केंद्र असून त्यात ३५ शीतगृह, १९ प्रशितकरण १९ आणि फळे पिकविण्याची ११ केंद्र आहेत. शीतगृहांची क्षमता १ हजार ११९ टन, प्रशितीकरण ९५ आणि फळे पिकविण्याच्या केंद्राची २०० टन इतकी क्षमता आहे. आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्राच्या शीतगृहांची क्षमता ५०० टन, प्रशितीकरण १०० टन, फुले निर्यात सुविधा केंद्राच्या शितृहांची क्षमता ३०० आणि प्रशितीकरणाची क्षमता ३० टन इतकी आहे. निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी संस्था, बाजार समित्या, वैयक्तिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही केंद्र चालविण्यात येतात. या सुविधा केंद्रावरुन २६ कोटी ५५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा २७६१.४१ टन शेतमाल जर्मनी, नेदरलँड, थायलंड, दोहा, बहारीन, अमेरिकेत निर्यात करण्यात आला आहे. या शिवाय मुंबई, पुणे, दिल्ली आणि बेंगलोर या शहरातही या केंद्राच्या माध्यमातून भाजीपाला पाठविण्यात आला आहे. त्यात कांदा, बटाटा, केळी, संत्रा, मोसंबी, लिंबू, गुलाब, फुले या शेतमालाचा समावेश आहे. त्यातून १ कोटी ८० लाख ११ हजार रुपयांचा ७९६.१० टन शेतमाल पाठविला आहे. या केंद्रावर ४१२ कुशल आणि १ हजार ५०५ अकुशल अशा १ हजार ९१७ जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. यंदाच्या आंबा हंगामात पणन मंडळाच्या सुविधा केंद्रावरुन १ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीAmericaअमेरिका