शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख देऊनही विवाहितेला दिले घरातून हाकलून, सासरच्या चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 19:48 IST

अनुजा व नीलेश यांचा विवाह १५ मे २०१५ रोजी झाला. लग्नासाठी अनुजा हिच्या वडिलांनी सुमारे २५ लाख रुपये खर्च केला. सुरुवातीला दोन ते तीन महिने तिला व्यवस्थित नांदविण्यात आले.

ठळक मुद्दे जमीन विक्रीतून आलेल्या पैशातून त्यांनी ४ लाख रुपये रोख व ६ लाख रुपये धनादेशाद्वारे असे एकूण १० लाख रुपये दिले.तोंडावर उशी दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न

लोणी काळभोर : गेल्या तीन वर्षांपासून घरातील काम नीट करता येत नाही. तसेच माहेरकडून १० लाख रुपये आणावेत, या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार घडला. तिच्या तक्रारीनंतर पतीसह सासरा, सासू व एक महिला या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनुजा नीलेश कांचन (वय २४, रा. स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, सध्या रा. कुंजीरवाडी, धनश्री मंगल कार्यालयाशेजारी, ता. हवेली) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती नीलेश जयसिंग कांचन, सासरा जयसिंग बाबूराव कांचन, सासू नलिनी जयसिंग कांचन (तिघे रा. स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन) व पतीची रखेल वीणा बाळासोा परदेशी (रा. उरुळी कांचन) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुजा व नीलेश यांचा विवाह १५ मे २०१५ रोजी झाला. लग्नासाठी अनुजा हिच्या वडिलांनी सुमारे २५ लाख रुपये खर्च केला. सुरुवातीला दोन ते तीन महिने तिला व्यवस्थित नांदविण्यात आले. त्यानंतर पती रात्री-अपरात्री मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन तिला क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ व मारहाण करू लागला. तिने मारहाणीचे कारण विचारले असता त्याने मी दुसरी बाई ठेवली आहे. तू मी सांगेन तसेच राहायचे, असे सांगितले. ही बाब तिने आई-वडिलांना फोनवरून सांगितली. परंतु सुधारणा होईल, या आशेने पोलीस ठाण्यात तक्रार न देता त्रास सहन करीत नांदत राहिली.त्यानंतर हॉटेल सुरू करायचे आहे, माहेरकडून १० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला. हा  प्रकार तिने वडिलांना सांगितल्यानंतर ते लग्नातील मध्यस्थांना समवेत घेऊन तिच्या घरी गेले. सर्वांना समजावून सांगितले. त्यानंतर तिचे वडील पूनमचंद यांनी स्वत:च्या नावावर असलेली जमीन विकली. जमीन विक्रीतून आलेल्या पैशातून त्यांनी ४ लाख रुपये रोख व ६ लाख रुपये धनादेशाद्वारे असे एकूण १० लाख रुपये दिले. यानंतर सुख लाभेल, या आशेने अनुजा सासरी नांदत राहिली. परंतु तिच्या सासरी काहीच फरक पडला नाही. तिला शिवीगाळ, मारहाणीचा प्रकार सुरूच होता. नीलेश दुसºया महिलेला घरी घेऊन येऊन तिच्यासमवेत राहत असे व अनुजा हीस शिवीगाळ, दमदाटी करून तू या घरात राहावयाचे नाही, निघून जा असे म्हणत.३ एप्रिल २०१८ रोजी नीलेश रात्री दारू पिऊन घरी आला व नेहमीप्रमाणे अनुजा हीस शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तोंडावर उशी दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर ४ एप्रिल रोजी पुन्हा तिला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. त्यानंतर पती व सासू-सासरे यांनी तिला घराच्याबाहेर काढून तू येथे राहायचे नाही, निघून जा, असे म्हणून तिला माहेरी पाठवून दिले.        

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाPoliceपोलिस