विवाहीत महिला दोन मुलीसह बेपत्ता

By Admin | Updated: June 26, 2016 15:46 IST2016-06-26T15:46:42+5:302016-06-26T15:46:42+5:30

जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील विवाहित महिला आपल्या दोन मुलीसह बेपत्ता झाली आहे असे जुन्नर पोलिसांनी सांगितले.

Married women missing with two girls | विवाहीत महिला दोन मुलीसह बेपत्ता

विवाहीत महिला दोन मुलीसह बेपत्ता

>ऑनलाइन लोकमत 
आपटाळे दि २६-  जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील विवाहित महिला आपल्या दोन मुलीसह बेपत्ता झाली आहे असे जुन्नर पोलिसांनी सांगितले.
 
गोद्रे येथील विवाहित महिला सौ.रोहिणी लक्ष्मण भोजणे वय २५ ही आपल्या मुलीचे जन्माचे दाखले जुन्नर मधून घेऊन येते ,असे सांगून जुन्नरला आली होती.
 
सायंकाळी ती घरी न आल्याने तिचा नवरा शोध घेवू लागला.अनेक नातेवाईकाकडे चौकशी केली परंतु ती व मुली सापडल्या नाहीत.सौ.रोहिणी व तिच्या दोन लहान मुली वैष्णवी वय ३वर्षे, वेदिका वय १० महिने यांना घेऊन ती बेपत्ता झाली आहे.

Web Title: Married women missing with two girls