नसरापूर : भोर तालुक्यातील हातवे येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली असून तिच्या अडीच वर्षांच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत विवाहितेचे वडील दिलीप तळेकर यांनी राजगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू व नणंद यांना ताब्यात घेतले आहे.राजगड पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, नीलम मनोज थिटे (वय ३०, रा. हातवे, ता. भोर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिची अडीच वर्षांची मुलगी शामवी (केतकी) मनोज थिटे हिचा मृतदेह भिलारेवाडी, हातवे येथील शेतातील विहिरीत तरंगताना आढळला आहे. याप्रकरणी पती मनोज दिनकर थिटे, सासू रत्नमाला दिनकर थिटे व नणंद जयश्री दिनकर थिटे यांना राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हातवे येथे सासरच्या जाचास कंटाळून अडीच वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:34 IST
सासरच्या लोकांकडून मुलीचा वारंवार छळ होत होता, तर मुलीस स्वयंपाक येत नाही, पाणी जास्त वापरते, फरशी पुसता येत नाही आदी कारणावरून तिचा छळ होत होता.
हातवे येथे सासरच्या जाचास कंटाळून अडीच वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या
ठळक मुद्देयाप्रकरणी पतीसह सासू व नणंद यांना ताब्यात